परभणी कृषि महाविद्यालयात ग्रामीण
कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उदबोधन कार्यशाळा संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या कृषि पदवी अभ्यासक्रमाच्या
सातव्या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असतो, सदरिल कार्यक्रम राबविण्यासाठी
उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 19 जुन रोजी
करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षण विभागाचे
विभाग प्रमुख डॉ राकेश आहिरे हे होते तर व्यासपीठावर डॉ ए एस कार्ले, डॉ एच व्ही
काळपांडे, डॉ जे व्ही एकाळे, डॉ के टी आपेट, डॉ ए के गोरे, प्रा कुलदिप शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ राकेश
आहिरे म्हणाले की, परभणी
जिल्हयात कापुस हे महत्वाचे नगदी पिक असुन कापसावरील बोंडअळीचे व्यवस्थापन
तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्याक्रमाच्या
कृषीदुतांनी व कृषीकन्यांनी पुढाकार घ्यावा. येणा-या खरिप हंगामात कापुस
पिकावरील गुलाबी बोंडअळी, मक्यावरील लष्करी अळी व हुमणी किडींचा प्रादुर्भाव होऊ
नये म्हणुन विविध उपाययोजना राबविण्यादृष्टीने
कृषि विभाग व विद्यापीठाच्या वतीने विशेष अभियान सुरू असुन या अभियानात कृषिच्या
विद्यार्थ्यींनी आपले योगदान द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
तांत्रिक सत्रात विविध विषयावर
विशेष विषय तज्ञ डॉ के टि आपेट, डॉ डि व्ही बैनवाड, डॉ सुनिता पवार, डॉ ए एम
कांबळे, डॉ डि आर कदम, डॉ एस आर नागरगोजे, डॉ एस एल वाईकर, डॉ एस जे शिंदे, डॉ ए
एस बागडे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रविण कापसे यांनी
केले तर आभार प्रा आर सी सावंत यांनी मानले. कार्यक्रमास रावेचे कार्यक्रम अधिकारी
डॉ आर जी भाग्यवंत, डॉ ए टी शिंदे, डॉ एस पी झाडे, डॉ सी व्ही अंबडकर, डॉ ए एम
भोसले, डॉ ए जी बडगुजर, डॉ मेघा सुर्यवंशी आदीसह ग्रामीण कृषी कार्यानुभव
कार्यक्रमाचे कृषिदुत व कृषिकन्या मोठया संख्येने उपस्थित होते.
कृषि पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असुन या सत्रातील विद्यार्थांना कृषिदुत व कृषिकन्या असे संबोधन्यात येते, हे
विद्यार्थ्यी प्रत्यक्ष शेतक-यांच्या शेती कसण्याचे
तंत्र व ग्रामीण जीवनपध्दतीचा अभ्यास करतात, तसेच विद्यापीठ विकसित
तंत्रज्ञानावर विविध प्रात्यक्षिके आयोजित करतात. यावर्षी महाविद्यालयाचे 212
विद्यार्थ्यी कृषिदुत व कृषिकन्या म्हणुन पुढील पंधरा आठवडे परभणी तालुक्यातील निवडक 25 गांवात कार्य करणार आहेत.