Wednesday, February 3, 2021

भारतीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष मा डॉ सुनील मानसिंगा यांची पशूशक्तिचा योग्य वापर प्रकल्पास सदिच्‍छा भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशूशक्तिचा योग्य वापर प्रकल्पास भारतीय कामधेनु आयोग (केंद्र सरकार) चे अध्यक्ष तथा पशु कल्‍याण बोर्डचे सदस्य मा डॉ सुनील मानसिंगा यांनी दि १फेब्रुवारी रोजी सदिच्‍छा भेट दिली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मा अंबादासजी जोशी, यवतमाळ गो आधारित शेतीचे श्री सुभाषजी शर्मा, सत्यनारायण सोनी (देवलापार), श्री राजेश सिंग ठाकूर, श्री शिवप्रसाद कोरे (श्री छत्रपती शिवाजी गोशाळा राणीसावरगाव), श्री राजेंद्र सोनी, श्री महेश सोनी, श्री लोया, श्री रासवे (रामेटाकली), डॉ चौधरी साहेब, श्री दत्ता पहारे आदींनी भेट दिली.

विद्यापीठ विकसित पशुशक्तीवर चालणारे यंत्रे, रोटरी मोड अग्रप्रोसेसिंग युनिट, सौऊर्जेवर चालणारे बैलचालित फवारणी यंत्रे आदीची मान्‍यवरांनी पाहणी केली. पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाच्‍या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांनी विविध बैलचलीत सुधारित शेती अवजारे याबद्दल माहिती दिली तर अपारंपारिक ऊर्जा विभागाचे प्रमुख डॉ. राहूल रामटेके यांनी सौर उर्जाचालित फवारणी यंत्र, सौर निक्षरिकरण यंत्र, जनावरे, पक्षी पळवणारे यंत्र याबद्दल माहिती दिली तसेच  श्री. अजय वाघमारे यांनी रोटरी मोड चे  प्रात्यक्षित दाखविले.

मा. श्री सुनील मानसिंगकाजी व मा. श्री अंबादासजी जोशी यांनी विकसित बैलचलित अवजारे यांची प्रशंसा केली तसेच नमूद केले की बैलचलित सुधारित शेती अवजारे द्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीतील कष्ट कमी करून निविष्ठांचा योग्य वापर करून नक्कीच त्यांच्या एकंदरीत शेतीतील आर्थिक व्यवहार व उत्पन्नामध्ये मदत होईल तसेच बैलाने चालणारे रोटरी मोड प्रक्रिया यंत्रे स्वयंरोजगार करिता उपयुक्त असल्याचे सांगितले. इतर उपस्थित मान्यवरांनी सदरील औजारे हे गो पालनाकरिता अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. यावेळी दीपक यंदे, भारत खटिंग, रुपेश काकडे, पवार मावशी, अवाड, अमोल, अनिल हरकळ, आशुतोष काकडे आदींचे सहकार्य लाभले.