वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्र व अखिल भारतीय समन्वयीत ज्वार सुधार प्रकल्प, हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे मानोली (ता मानवत जि परभणी) येथे दिनांक २३ फेब्रुवारी रोजी शेतकरी श्री अशोकराव मांड यांच्या शेतातील रब्बी ज्वारी आद्यरेषीय पिक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरीक श्री ऋषीकेश मांडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर हे होते. तर ज्वार संशोधन केद्रांचे प्रभारी अधिकारीडॉ के आर कांबळे, डॉ एल एन जावळे, डॉ महमंद ईलीयास, डॉ व्ही एम घोळवे, डॉ मदन पेंडके, प्रगतशील शेतकरी श्री मदन महाराज शिंदे, श्री रामभाऊ शिंदे आदीची उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ वासकर म्हणाले की, आहारात ज्वारीच्या भाकरीस पोषणाच्या दृष्टीने मोठे महत्व असुन ज्वारीचे मुल्यवर्धन करून विविध पदार्थ केल्यास बाजारात चांगला भाव मिळेल, प्रास्ताविकात डॉ के आर कांबळे यांनी विद्यापीठ विकसित रब्बी ज्वारीच्या नवीन वाण व लागवडीबाबत माहिती दिली. यावेळी श्री अशोकराव मांड, लक्ष्मण शिंद, शेख दस्तगीर यांच्या शेतावरील रब्बी ज्वारी पिक प्रात्यक्षिकाची पाहणी केली. कार्यक्रमास शेख दस्तगीर, माजी सैनिक बाबुराव जाधव, रामकिशन पटेल श्री गोपाल शिंदे, सुनील शिंदे, सुरेश मांड, उत्तम लेंगुळे आदीसह गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.