Tuesday, June 1, 2021

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते आदिवासी क्षेत्रातील शेतक-यांना कृषि अवजारांचे वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय संशोधन समन्‍वयीत पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प व हैद्राबाद येथील अखिल भारतीय ज्वार संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उपयोजने अंतर्गत आर्थिक व सामाजिक जीवन उंचावण्‍याच्‍या दृष्‍टीने आदीवासी शेतक-यांचा कृषि अवचारे वाटप व प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १ जुन रोजी पार पडला. कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री. रणजीत पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवत्तराज, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, अपारंपारीक ऊर्जा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आर टी रामटेके ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ के आर कांबळे, डॉ एल एन जावळे आदींची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शनात कुलगुरु मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, शेतीत वाढती मजुरांची समस्‍या व वाढती मजुरी यांचा विचार करता विद्यापीठ विकसित कृषि अवजारे व यंत्र हे शेतकरी बांधवासाठी उपयुक्‍त असुन काबाटकष्‍ट कमी करणारे आहेत. ही अवजारे आदिवासी शेतकरी बांधवापर्यंत पोचविण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न असुन आदिवासी शेतकरी बांधवांनी या कृषि अवचारांचा वापर करून आपले कृषि उत्‍पादन वाढवावे, असे आवाहन केले. 

संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी कृषि यांत्रिकीकरण काळाची गरज असून अल्पभुधारक शेतक­यांसाठी बैलचलित अवजारे कमी किंमतीची व शेतक­यांना परवडतील अशी निर्माण करावीत असे नमूद केले.

यावेळी करोना विषाणु रोग्‍याच्‍या प्रादुर्भाव प्रतिबंधात्‍मक बाबींचे काटेकोर पालन करुन मान्यवरांच्या हस्ते नाशिक येथील आदीवासी शेतकरी बांधवासाठी काम करणारी प्रगती अभियान संस्था यांचे पदाधिकारी व मौजे असवली हर्ष (ता. त्र्यंबक जि. नाशिक) येथील ब्रम्‍हगिरी आदिवासी शेतकरी गटाचे शेतकरी बांधवाना ही कृषि अवचारे वाटप करण्‍यात आली. यात मनुष्य चलित, बैलचलित व ट्रॅक्टर चलित अवजारे जसे पेरणी, कोपणी, काढणी, प्रतवारी करणे यंत्र, मळणी यंत्र व पिठ गिरणी असे शेतक­यांचे कष्ट कमी होऊन कमी वेळेत जास्तीत जास्त काम होण्यास उपयूक्त विविध अवजारे / यंत्राचा समावेश आहे. या अवचारांच्‍या वापराबाबत योजनेच्या प्रमुख संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांनी मार्गदर्शन केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्मिता सोलंकी यांनी केले तर आभार डॉ. एस. एस. देशमुख यांनी मानले. कार्याक्रम यशस्वीतेकरिता प्रा डी डी टेकाळे, श्री ए ए वाघमारे, श्री डी बी येंदे, सौ. सरस्वती पवार, श्री. गजानन पकाणे, श्री. भारत खटिंग, श्री. रुपेश काकडे, श्री. महादेव आव्हाड आदींनी परिश्रम घेतले.