खरीप पूर्व
नियोजनाच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि
तंत्रज्ञान माहिती केंद्र ,परभणी रिलायन्स फाउंडेशन आणि महिला आर्थिक विकास
महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मणगाव ता. जि. परभणी
येथे महिला शेतकऱ्यांकरिता सोयाबीन बियाणांची उगवण शक्ती तपासण्याच्या प्रात्यक्षिकाचे
दिनांक १४ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माहिती केंद्राचे विस्तार कृषि विद्यावेता डॉ.गजानन गडदे, यांनी
सोयाबीन उगवण शक्तीचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करून दाखविले आणि सोयाबीन बियाणाची
उगवण शक्ती 70 टक्के पेक्षा
जास्त असणे आवश्यक आहे असल्याचे
नमूद करून सोयाबीन लागवड
तंत्रज्ञानाविषयी त्यांनी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तद्नंतर माविमचे
जिल्हा समन्वयक श्री बाळासाहेब झिंगार्डे यांनी महिला शेतकऱ्यांना
बचत गट सक्षम करणे तसेच कृषिशी निगडीत जोडधंदे उभारण्यामध्ये महिलांनी पुढाकार घेण्याचे
आवाहन केले. यावेळी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री काळदाते यांची
प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माविमच्या सौ. भालेराव मॅडम यांनी केले तर आभार
प्रदर्शन रिलायन्स फाउंडेशन चे श्री रामा राऊत यांनी मानले. कार्यक्रमास गावातील ५५ महिला शेतकऱ्यांनी
सहभागी होवून उत्स्फूर्त
प्रतिसाद नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रिलायन्स
फाउंडेशनच्या श्री शेळके यांनी प्रयत्न केले.