Thursday, January 10, 2013

वि़द्यापीठात प्रसिध्‍द विचारवंत श्री इ व्‍ही स्‍वामिनाथन यांचे व्‍याख्‍यान

मराठवाडा कृषि विद्या‍पीठात स्‍वामी विवेकानंद जयंतीनिमित्‍य राष्ट्रिय युवा दिनी मुंबईचे प्रसिध्‍द विचारवंत श्री इ व्‍ही स्‍वामिनाथन यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले आहे.  दि 12 जानेवारी 2013 रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात सकाळी 9.30 ते 12.30 दरम्‍यान ते भावनिक अभियांत्रीकी, जीवन जगण्‍याची कला, तणावमुक्‍ती आदी विषयावर आपले विचार मांडणार आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ. किशनराव गोरे राहणार असुन शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आणि संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  या कार्यक्रमास जास्‍तीतजास्‍त संख्‍येने विदयार्थ्‍यानी, नागरिकांनी, प्राध्‍यापकांनी व कर्मचा-यांनी उपस्थित राहावे असे आवाहन गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा विशाला पटटणम व कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ नागोराव पवार यांनी केले आहे.