Wednesday, July 2, 2014

‘कृषि सांज वाहिनी’ चे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा उपक्रम
कृषि सांज वाहिनी” च्‍या उदघाटन प्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, परभणी जिल्‍हा परिषदच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाताई बुधवंत, प्राचार्य डॉ. बी बी भोसले, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्रगतशिल शेतकरी श्री. सुर्यकांतराव देशमुख, श्री. सोपानराव अवचार, श्री केशवराव बुधवंत, कृषि विकास अधिकारी श्री बळीराम कच्‍छवे, डॉ हेमा सरंबेकर , डॉ आनंद गोरे व उपस्थिती अधिकारी व शेतकरी.
कृषि सांज वाहिनी” च्‍या उदघाटन प्रसंगी  सांज वाहिनी वर आलेल्‍या शेतक-यांच्‍या प्रश्‍नांना उत्‍तर देतांना शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे सोबत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण,  परभणी जिल्‍हा परिषदच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाताई बुधवंत, प्राचार्य डॉ. बी बी भोसले, श्री केशवराव बुधवंत आदी.
*******************************************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत दर मंगळवारी सकाळी  ९ ते  ११  या वेळेत कृषि माहिती वाहिनी ही सेवा शेतक-यांसाठी नियमित चालविली जाते. यासेवेतंर्गत ०२४५२-२२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर मोठया संख्‍येने शेतकरी शेतीबाबतच्‍या विविध शंकाचे निरासन करण्‍यासाठी विद्यापीठाच्‍या तज्ञांशी संपर्क साधत असतात. आता या वाहिनीचा लाभ शेतक-यांना दर मंगळवारी संध्‍याकाळी ६ ते  या वेळेतही होणार आहे. यासाठी दि.  जूलै २०१४  रोजी हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मदिनी व कृषि दिनाचे औचित्‍य साधुन कृषि सांज वाहिनीचे उदघाटन करण्‍यात आले. या उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे होते तर शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, परभणी जिल्‍हा परिषदच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाताई बुधवंत, प्राचार्य डॉ. बी बी भोसले, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्रगतशिल शेतकरी श्री. सुर्यकांतराव देशमुख, श्री. सोपानराव अवचार, श्री केशवराव बुधवंत, कृषि विकास अधिकारी श्री बळीराम कच्‍छवे, डॉ हेमा सरंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे आपल्‍या भाषणात म्‍हणाले कि, कृषि सांज वाहीनी सुरू करणार कदाचित देशातील पहिले विद्यापीठ असुन, यामुळे शेतकरी व कृषि विद्यापीठ यांच्‍यातील नाते दृढ होण्‍यास मदत होणार आहे.
विद्यापीठ शेतक-यांच्‍या अडीअडचणी सोडविण्‍यासाठी सदैव तत्‍पर असते, या वाहिनीमुळे अजुन एक चांगले माध्‍यम शेतक-यांच्‍या शेतीच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी विद्यापीठाने खुले केले आहे, अशी भावना पर‍भणी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाताई बुधवंत यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केली. तर परभणी कृषि महाविद्यापीठाचे प्राचार्य डॉ बी बी भोसले मनोगतात म्‍हणाले कि, कृषि विद्यापीठ अनेक माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत पोहचण्‍याचा प्रयत्‍न करीत असुन या कृषि सांज वाहिनी हे अजुन एका माध्‍यमाचा समावेश झाला आहे.
अध्‍यक्षीय समारोपात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण म्‍हणाले कि, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ नवनवीन विस्‍तार कार्यक्रमाच्‍या मार्फत शेतक-यांच्‍या बांधपर्यंत तंत्रज्ञान पोहचविण्‍याचे कार्य करीत असते, त्‍याचाच एक भाग म्‍हणजे ही कृषि सांज वाहिनी. या वाहिनीमुळे शेतकरी बांधव आपली शेतीची कामे आटोपुन गावात एकत्र बसुन सायंकाळाच्‍या वेळी वाहिनीवर विद्यापीठ तज्ञांशी प्रश्‍न विचारू शकतील, तरी अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या वाहिनीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन त्‍यांनी केले आहे.
     प्रगतशील शेतकरी श्री. सुर्यकांतराव देशमुख, श्री. सोपानराव अवचार, श्री केशवराव बुधवंत, कृषि विकास अधिकारी श्री बळीराम कच्‍छवे, प्रा. दिलीप मोरे, डॉ हेमा सरंबेकर आदींनी ही आपले मनोगत व्‍यक्‍त करून वाहिनीस शुभेच्‍छा दिल्‍या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी तर प्रास्‍ताविक डॉ आनंद गोरे यांनी केले.    
सदरिल वाहिनीची संकल्‍पना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची असुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ आनंद गोरे यांनी याचा नियोजन आराखडा तयार केला आहे. या सांज वाहिनीचे काम कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे व त्‍यांचे सहकारी श्री. डी.डी. पटाईत व श्री. एस. बी. जाधव हे पाहणार असुन विद्यापीठातील विविध विषयतज्ञ त्‍यांना सहकार्य करणार आहेत.
या उदघाटन कार्यक्रमाच्‍या वेळी डॉ बी एम ठोंबरे, डॉ ए पी सुर्यवंशी, डॉ राकेश अहिरे, डॉ पी एन सत्‍वधर, प्रा. दिलीप मोरे, डॉ. ए. टी. शिंदे, डॉ एल बी चौलवार, डॉ. आनंद बडगुजर, डॉ जी पी जगताप, प्रा एस डी पायाल, डॉ शिवाजी शिंदे, डॉ ए एम भोसले, प्रा यु एन कराड तसेच विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.