Tuesday, July 1, 2014

हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची १०१ वी जयंती साजरी



महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांच्‍या १०१ व्‍या जयंतीनिमित्‍य वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘कृषिदिन’ साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍य शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे यांच्‍या हस्‍ते कै. वसंतराव नाईक यांच्‍या पुतळयाचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या डॉ. हेमा सरंबेकर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. एस बी रोहीदास, विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील, डॉ. भ. वि. आसेवार, डॉ. बी. एम. ठोंबरे, डॉ. राकेश अहिरे तसेच विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापकवृंद व कर्मचारी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते.