वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत
असलेल्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम
अंतर्गत दिनांक २० ऑगस्ट रोजी मौजे झरी येथे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनावर मेळावा
आयोजीत करण्यात आला होता. मेळाव्यास प्रगतशील शेतकरी मा श्री कांतराव देशमुख,
उपसंरपंच कैलास रगडे, किटकशास्त्रज्ञ डॉ डि जी मोरे, वनस्पती विकृती तज्ञ प्रा
पी एच घंटे, डॉ डि जी दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोयाबीन पिकावरील
किडीविषयी डॉ. डी. जी. मोरे यांनी तर कापुस पिकावरील रोगाविषयी विद्यापीठातील प्रा
पी. एच. घंटे यांनी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वतीतेसाठी कृषिदुत नितीन ढोकर,
जिवन धोतरे, सुभाष इरतकर, युवराज धावने, अमोल जोंधळे, मंगेश गोरे, विजय घाटुळ,
वैजेनाथ कदम, गोपाळ डोंबे, अजित गावडे, द्रोपद घुगे, रामेश्वर कदम आदींनी परिश्रम
घेतले. या कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.