Saturday, September 2, 2017

बॅकिंग क्षेत्रात कृषी पदवीधरांना मोठया संधी........ प्रा. आकाश जाधव

वनामकृविच्‍या कृषी महाविद्यालयात गणेश उत्‍सवानिमित्‍त व्‍याख्‍यानमालेचे आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी महाविद्यालयात गणेश उत्‍सवानिमित्‍त व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 1 सष्‍टेबर रोजी कृषी पदवीधरांना बॅकिंग क्षेत्रातील संधी या विषयावर औरंगाबाद येथील संकल्‍प इज्‍युकेशनचे संचालक डॉ आकाश जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर व्‍यासपीठावर विभाग प्रमुख डॉ आर डी आहीरे, डॉ पी आर झंवर, डॉ डि पेरके, कृषि अधिकारी श्री सिध्‍दार्थ कोंगे, गणेश उत्‍सव समितीचे अध्‍यक्ष औंदुबर निंभोंरे, उपाध्‍यक्ष योगेश शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. आकाश जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कोणत्‍याही स्‍पर्धा परिक्षेत यश प्राप्‍त करण्‍यासाठी अभ्‍यासात सातत्‍य पाहिजे, नियमित वर्तमानपत्राचे वाचन करून चालु घडामोठीचे ज्ञान अवगत करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांनी इंग्रजी बाबत न्‍युनगंड बाळगु नये. भावी काळात कृषी पदवीधरांना बॅकिंग क्षेत्रात मोठया संधी असुन त्‍यांची तयारी करण्‍यासाठी कृषी पदवी पुर्ण करते वेळेसच पदवीचा अभ्‍यासक्रम गांभी-यांने केल्‍यास निश्चितच कमी कालावधीत यश प्राप्‍त होईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. कृषि अभ्‍यासक्रमाबाबत बॅक ऑफ इंडियाचे कृषि अधिकारी श्री सिध्‍दार्थ कोंगे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ता‍विक डॉ आर डि आहिरे यांनी केले. सुत्रसंचालन राहुल चौंरे यांनी केले तर आभार वैभव ढोकरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.