वनामकृवितील
सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व
संवर्धनासाठी जिमखान्याच्या वतीने चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
होते. या कार्यशाळेत कर्मानुसार होणारी फलप्राप्ती, मनावरील नियंत्रण, सकारात्मक
दृष्टिकोण, एकाग्रता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी ध्यानधारणा आदी विषयांवर मानवी
मुल्य तज्ञ बीके सीमा, बीके अर्चना, प्राचार्य प्रा. विशाला पटनम यांनी मार्गदर्शन
केले. कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य प्रा. विशाला पटनम यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आले होते. कार्यशाळेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने
सहभाग नोंदविला होता. सदरिल कार्यशाळेचा स्वत:चे कर्तव्य व भुमिका सक्षमपणे पार
पाडण्यास निश्चितच फायदा होईल, अशी प्रतिक्रिया यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी
व्यक्त केली.