वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
परभणी कृषी महाविद्यालयात दिनांक 24 सप्टेबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन
साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळासाहेब
जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे
होते. व्यासपीठावर प्रा विजयकुमार जाधव, प्रा. रणजित चव्हाण, डॉ पपिता गौरखेडे आदींची
प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव मार्गदर्शन
करतांना म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ योजना नसुन विद्यार्थ्यांना
सुसंस्कृत करणारी चळवळ आहे, याव्दारे विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकासित
होण्यास निश्चितच हातभार लाभतो. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी रासेयोच्या माध्यमातुन समाज
सेवा करावी, असे प्रतिपादन त्यांनी केले तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ डि एन
गोखले यांनी विद्यार्थ्यांनी रासेयोच्या कार्यातुन सामाजिक बांधिलक जोपासण्याचा
सल्ला दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक स्वयंसेविका सोनाली उबाळे हिने केले तर
आभार प्रियांका माटे हिने मानले. याप्रसंगी रासेयोच्या स्वयंसेवकांनी महिला
सबलीकरण, शेतकरी आत्महत्या आदीवर आधारित नाटीका सादर केले. कार्यक्रमास
महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.