वसंतराव नाईक, मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण (आत्मा) कृषि विभाग परभणी
यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 ऑगस्ट रोजी मौजे मानोली (ता.मानवत) येथे शेती आधारीत तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण
कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास संरपंच ज्ञानोबा शिंदे, महाराष्ट्र ग्रामीण बॅकाचे विभागीय व्यवस्थापक डी. डी. भिसे, रेशीम संशोधन योजनेचे
प्रभारी अधिकारी डॉ सी बी लटपटे, डी. डी. भिसे, पी.एम. जंगम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सी. बी. लटपटे यांनी गावातील शेतकरी पुरुषोत्तम शिंदे यांच्या शेतावर तुती लागवटीची पटटा पध्दत, खत व पाणी व्यवस्थापन, रेशीम कीटक संगोपनासाठी रॅकची रचना आदी विषयी प्रात्यक्षिकाव्दारे मार्गदर्शन केले. तसेच कापसावरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापनावर मार्गदर्शन करतांना
शेतक-यांनी प्रती एकरी आठ कामगंध सापळे लावण्याचा सल्ला दिला. कापसाच्या डोम कळया गोळा
करुन नष्ट करून योग्य किटकनाशकाची फवारणी करावी,
फवारणी करतांना डोळयावर गॉगल, हॅन्ड ग्लोज, चेह-यावर मास्क वापरण्याचा
सल्ला दिला. डी. डी.
भिसे आणि पी. एम.
जंगम यांनी शेतक-यांनी बँके कडून कर्ज
घेण्यासाठी प्रस्ताव परिपुर्णरित्या तयार करुनच दाखल करण्याविषयी सुचवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
कृषि पर्यवेक्षक जी. आर. शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन शंकर मांडे
यांनी केले तर
आभार कृषि
विभागाचे श्री. माने यांनी
मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
सुनिल शिंदे, तलाठी अरंविद चव्हाण, शंकर मांडे आदीसह समस्त गावक-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.