ग्रामीण कृषि कार्यानुभव
कार्यक्रमांतर्गत कृषिकन्यांनी केले आयोजन
परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय व अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती
संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत
कार्यरत असलेल्या सातव्या सत्राच्या कृषिकन्यांनी मौजे उजळंबा येथे दिनांक 15
ऑक्टोबर रोजी रबी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर उजळंबा गांवचे सरपंचा श्रीमती रूक्मीणबाई
मोगले, बाभुळगांव गांवचे सरपंच गणेश दळवे, विभाग प्रमख डॉ आर डी आहिरे, डॉ बी एम
ठोंबरे, डॉ जी आर हनवते, कृषि अधिकारी श्री वैजनाथ रणेर, प्रगतशील शेतकरी राजाभाऊ
रगड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ डि एन गोखले
आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, शेतकरी बांधवानी गट शेतीच्या माध्यमातुन शेती
केल्यास निश्चितच फायदा होतो, विशेषत: गटाच्या माध्यमातुन शेतमाल विक्री केल्यास
योग्य भाव मिळवु शकतो. कोरडवाहु शेती मध्ये पिक लागवड करतांना योग्य झाडांची
संख्या राखणे आवश्यक असुन आंतरपिक पध्दतीचा जास्तीत जास्त अवलंब करण्याचा
सल्ला त्यांनी दिला.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध
व्यवसायावर डॉ बी एम ठोंबरे यांनी तर विद्यापीठ विस्तार सेवेबाबत डॉ आर डी आहिरे
व रबी पिकांच्या लागवडीवर डॉ जी आर हनवते यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ बी व्ही आसेवार यांनी केले. सुत्रसंचालन अदिती वाघ हिने केले तर
आभार डॉ ए पी जगताप यांनी मानले. कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठया संख्येने
उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषिकन्यांनी परिश्रम घेतले.