Wednesday, October 3, 2018

गृहविज्ञान अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने स्वच्छता अभियान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामाजिक विज्ञान महाविद्यालयांतर्गत असलेल्‍या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने दिनांक 2 ऑक्‍टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली, त्यानिमित्ताने विद्यापीठ प्रशासकीय इमारत परिसरात स्‍वच्‍छता फेरी काढुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यापीठाच्‍या मुख्‍यप्रवेश व्‍दाराबाहेर विद्यार्थ्‍यी व कर्मचा-यांनी मानवी साखळी तयार करून परिसर स्‍वच्‍छ केला. कार्याक्रमात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी, प्रकल्‍पातील कर्मचारी आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन विभाग समन्वयक डॉ. जयश्री झेंड यांनी केले.