Tuesday, October 2, 2018

वनामकृवितील कुलगुरू कार्यालयात महात्‍मा गांधी जयंती साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कुलसचिव कार्यालयाच्‍या वतीने दिनांक 2 ऑक्‍टोबर रोजी राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी जयंती निमित्‍त कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते कुलगुरू कार्यालयातील महात्‍मा गांधी यांच्‍या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. त्‍याप्रसंगी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, उपकुलसचिव श्री रवींद्र जुक्‍टे, सहाय्यक कुलसचिव श्री पी के काळे, श्रीवास्‍तव आदी उपस्थित होते.