Monday, October 1, 2018

एलपीपी स्कूलमध्ये माता-पाल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व अभ्यास विभागातर्फे एलपीपी स्कूलचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात एलपीपी स्कूलचे विद्यार्थी, पालक, शिक्षिका व तृतीय वर्षाच्या (मानव विकास व अभ्यास विभागाच्या) विद्यार्थींनीनी नावीन्यपूर्ण असे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम जसे की, समुहनृत्य, लघूनाटिका, आई-पाल्य, वडील-पाल्य यांचे नृत्य व गायन आदींचे सादरीकरण केले. याप्रसंगी काही आजींनी देखील आपल्या नातवांबरोबर आपली कला उत्स्फूर्तपणे सादरीकरण करून उपस्थितांची मन जिंकली. कार्यक्रमास प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर, विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम, डॉ. विजया नलावडे, श्रीमती सीमा पृथ्वीराज मीना आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात सहभागी कलाकारांना विविध कलांचे स्टार अॅवार्ड प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. विशाला पटनम यांच्‍या मार्गदर्शनाखाली एलपीपी स्कूलच्या शिक्षिकांनी केले.