वनामकृवित आयोजित लघू प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन
देशातील शेतकऱ्यांचे सरासरी जमीनधारण क्षेत्र अत्यंत कमी असून केवळ पीक लागवड करुन शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाची निर्वाह शेतीमधून होणे अशक्य आहे. कोरडवाहु भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेती पूरक व्यवसायाची सांगड घातल्यास उत्पन्न वाढवणे शक्य होईल, असे प्रतिपादन कुलगुरू या डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कोरडवाहू संशोधन केंद्राद्वारे भारतीय कृषी अनुसंधान परिषद प्रायोजित, “शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी एकात्मिक शेती” यावर दहा दिवसीय लघू प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटनाप्रसंगी (दि २१ नोव्हेंबर) रोजी ते बोलत होते.
व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एन. गोखले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु.एम. खोडके, सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री झेंड, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीच्या दृष्टीने केवळ पिक पध्दतीवर अवलंबून न राहता नैसर्गिक संसाधनाच्या उपलब्धतेनुसार पिकपध्दतीबरोबर शेती पुरक जोडधंद्याचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात प्रशिक्षण संचालक डॉ. वासुदेव नारखेडे यांनी एकात्मिक शेती पध्दतीचे महत्व सांगितले. सुत्रसंचलन प्रा. सुनिता पवार यांनी केले तसेच आभार डॉ. मदन पेंडके यांनी मानले. कार्यक्रमास विविध विभागांचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील तसेच गुजरात, कर्नाटक इ. राज्यातील विविध कृषि विद्यापीठामधून प्रशिक्षणार्थी शास्त्रज्ञ सहभागी झाले असुन एकात्मिक शेती पध्दतीच्या अवलंबामुळे शेतक-याचे उत्पन्न वाढ, जमिनीची सुपिकता, रोजगार निर्मिती तसेच उपलब्ध पिकाच्या अवशेषाचे पुनर्रवापर, व संसाधनाचा योग्य वापर आदी विषयांवर विविध शास्त्रज्ञांची व्याख्याने आयोजीत करण्यात आले आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशिक्षणाचे समन्वयक डॉ. व्ही. बी. अवसरमल, डॉ. जी. आर. हनवते, डॉ. आय.ए.बी. मिर्झा, डॉ. मदन पेंडके, प्रा. सुनिता पवार, श्री. दिपरत्न सुर्यवंशी, श्रीमती सारिका नारळे, श्री. महेबूब सय्यद, श्री. मोरेश्वर राठोड, सुमित सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.