कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करा..... वनामकृवितील किटकशास्त्रज्ञांचा सल्ला
डोंम कळी |
मराठवाडयात
काही ठिकाणी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. मागील काही दिवसात झालेल्या परतीच्या
पावसामुळे कपाशीला नवती फुटून काही प्रमाणात पाते, फुले व बोंडे लागत आहेत.
त्याचबरोबर गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत असुन मादी पतंग पाते,
फुले यावर अंडी घालतात. सध्या पाण्याची उपलब्धता असल्यामुळे बरेचशे
शेतकरी मोठया प्रमाणावर
कपाशीचे फरदड (पुर्नबहार) घेऊ शकतात, त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव
होण्याची शक्यता किटकशास्त्र विभागाच्या
शास्त्रज्ञानी व्यक्त केली आहे तरी
फरदड न घेण्याबाबत आवाहन
सुध्दा करण्यात येत
आहे.
गुलाबी
बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे आवाहन करण्यात येत
आहे.
सदय स्थितीत व्यवस्थापन :
- प्रादुर्भावग्रस्त गळालेली
पाने व बोंडे जमा
करुन नष्ट करावे.
- डोमकळ्या दिसून
आल्यास त्या तोडून आतील
अळीसह नष्ट करावे.
- गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध
सापळे वापरावे (हेक्टरी पाच सापळे) सरासरी आठ ते
दहा पतंग प्रति सापळा
सतत दोन ते तीन
दिवस ही आर्थिक नुकसानीची
पातळी समजावी.
- गुलाबी बोंडअळीचे पतंग कामगंध
सापळयात आढळल्यास त्वरीत अझाडिरॅक्टीन 1500 पीपीएम 40-50 मिली दहा लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
- उपलब्धते प्रमाणे कपाशीत
एकरी तीन ट्रायकोकार्ड ट्रायकोग्रामाटॉयडीया बॅक्ट्री
या परोपजीवी गांधीलमाशीचे
कार्ड (हेक्टरी दीड लाख
अंडी) कपाशीत पानाच्या खालच्या बाजूस लावावेत.
- कपाशीची फरदड (पुर्नबहार) घेण्याचे टाळावे.
कपाशीच्या
झाडावरील पाते, बोंडे, यांची अपेक्षीत संख्या असल्यासच खालील पैकी किटकनाशकाच्या
फवारणी घ्यावी.
फवारणीसाठी कीटकनाशके
प्रादुर्भाव
|
कीटकनाशके
|
प्रमाण/दहा लिटर पाणी
|
5
टक्के
|
अझाडिरॅक्टीन 0.15 टक्के
|
50 मिली
|
अझाडिरॅक्टीन 0.30 टक्के
|
40 मिली
|
|
क्विनॉलफॉस 25 ई सी
किंवा
|
20 मिली
|
|
प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा
|
20 मिली
|
|
क्लोरोपायरीफॉस 20 ईसी
|
25
मिली
|
|
5-10
टक्के
|
थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा
|
20 ग्रॅम
|
इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एस जी
|
4
ग्रॅम
|
|
10
टक्के पेक्षा जास्त
|
थायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडा
साहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी
|
04 मिली
|
प्रोफेनोफॉस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4
टक्के
|
20
मिली
|
वरीलप्रमाण हे
साध्या पंपासाठी आहे.
पेट्रोल पंपासाठी हे
प्रमाण तीनपट वापरावे.