Friday, November 15, 2019

वनामकृवितील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत बालक दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाच्‍या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत दिनांक 14 नोब्‍हेंबर रोजी बालकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन प्राचार्या डॉ जयश्री झेंड उपस्थित होत्‍या. प्राचार्या डॉ जयश्री झेंड यांनी आपल्‍या मार्गदर्शनात पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या जीवन कार्याला उजाळा दिला तर विभाग प्रमुख डॉ जया बंगाळे यांनी पं. जवाहरलाल नेहरु यांचे पूर्व प्राथमिक शिक्षणात असलेले योगदान स्पष्ट केले. सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्‍यांनी बहारदार नृत्ये व भाषणे केली, त्याबद्दल सहभागी विद्यार्थ्‍यांना प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. वीणा भालेराव सह विभागातील पदव्यूत्तर विद्यार्थी, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका वर्षा लोंढे यांनी केले.