Sunday, November 17, 2019

वनामकृवित शेती उत्‍पन्‍न वाढीकरिता एकात्मिक शेती पध्दती यावर प्रशिक्षणाचे आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ ते २७ नोव्हेंबर दरम्यान शेत्‍पन्‍न वाढीकरिता एकात्मिक शेती पध्दती याविषयावर दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. सदरिल प्रशिक्षणा देशातील विविध कृषि विद्यापीठे व कृषि संबधीत संस्थामधील शास्त्रज्ञ तथा प्राध्यापक सहभागी होणार आहेत.
देशातील सरासरी जमीन धारणा क्षेत्र केवळ .१६ हेक्टर असुन शेतीवर अवलंबुन असलेल्या कुटुंबाची अन्नधान्य व इतर बाबींची पुर्तता होत नसल्याने एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करुन शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय यांची योग्य सांगड घातल्याशिवाय शेतक-याचे उत्‍पन्‍न वाढणे क्य आहे. सदरिल प्रशिक्षणा शेतक-याचे उत्‍पन्‍न वाढविण्याच्या दृष्टीने विशेष भर देण्यात येणार आहे. एकात्मिक शेती पध्दतीच्या अवलंबामुळे शेतक-याचे उत्पन्न वाढ, जमिनीची सुपिकता, रोजगार निर्मिती तसेच उपलब्ध पिकाच्या अवशेषाचे पुनर्रवापर, व संसाधनाचा योग्य वापर आदी विषयांवर विविध शास्त्रज्ञांची व्याख्याने आयोजीत करण्यात आली असून प्रशिक्षणार्थींना विविध संशोधन प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिकाद्वारेही मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमास कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे अध्यक्ष राहणार असून संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्‍य आयोजक अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्यशास्त्रज्ञ डॉ. डब्ल्यु. एन. नारखेडे हे आहेत.