Thursday, May 7, 2020

औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्‍या शास्त्रज्ञांकडून डायल आऊट कॉन्फरन्स च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन


औरंगाबाद जिल्‍हयातील शेतकरी बांधवाशी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचा संवाद
सध्या या कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी राज्‍यात  लॉकडाउन आहे, परंतु शेतीत मशागतीची व खरिप हंगामाची कामे प्रगतीपथावर आहे. येणा-या खरीप हंगाम पेरणीची पूर्वतयारी यावर औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्‍या शास्त्रज्ञांकडून डायल आऊट कॉन्फरन्स च्या माध्यमातून दिनांक 7 मे रोजी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी बांधवानी शेती विषयक समस्या विचारून निराकरण करून घेण्याचा प्रयत्न केला.  येत्या हंगामाच्या काळामध्ये शेतकाम करतांना घ्‍यावयाची काळजी, खरीप हंगामाची पूर्व तयारी, वाणाची निवड, बीजप्रक्रिया, खताचे व्यवस्थापन, जमिनीची मशागत विविध पिकांची लागवड व कीड-रोग व्यवस्थापन आदीविषयी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबाद येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस बी पवार, फळ संशोधन केंदाचे मुख्‍य शास्त्रज्ञ डॉ एम. बी. पाटील, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरें यांनी मार्गदर्शन केले. सदरिल कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद जिल्ह्यातील रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने डिजिटल टेक्नॉलॉजि चा वापर करून डायल आऊट कॉन्फरन्स करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक मनोज काळे व कार्यक्रम सहाय्यक आदेश देवतकर यांनी केले. कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकरी सहभागी झाले होते.