Thursday, October 1, 2020

वनामकृवि आयोजित पंधरा दिवसीय ऑनलाईन वेबीनार मध्‍ये सेंद्रीय शेतीमध्ये निर्यातीच्या संधी यावर मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर योजना आणि फॉर्म टू फोर्क सोल्युशन्स, मुंबई यांच्या संयुक्‍त विद्यमाने सेंद्रीय शेतीवर पंधरा दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २१ सप्‍टेंबर ते ९ ऑक्‍टोबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन दिनांक 30 सप्‍टेंबर रोजी सेंद्रीय शेतीमध्ये निर्यातीच्या संधी या विषयावर अपेडाचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. प्रशांत वाघमारे यांनी तर सेंद्रीय उत्‍पादनांचे विक्री व्यवस्थापन यावर मुंबई येथील हॉलिस्टिक न्युट्रिशनल फुडस प्रा. लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ऑलविन लोबो मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी चाकुर येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत पाटील हे होते, केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ आनंद गोरे, डॉ. रणजित चव्हाण, डॉ. कैलास गाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात श्री. प्रशांत वाघमारे यांनी सेंद्रीय शेतीत विशेषत: उत्पादीत फळपीके व भाजीपाला उत्‍पादनाचे विक्री व्यवस्थापन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सेंद्रीय कृषि मालासाठी निर्यातीच्या संधी, निर्यात करण्याची कार्यपध्दती, सेंद्रीय शेतीचे प्रमाणिकरण व शेतमाल निर्यात करण्यासाठी अपेडा संस्थेच्या उपलब्‍ध योजना याबद्दल  मार्गदर्शकेले. तसेच श्री. ऑलविन लोबो यांनी सेंद्रीय उत्पादनाच्या विक्री व्यवस्थापन करण्यासाठीचे तंत्रज्ञान, कार्यपध्दती, उपलब्ध सुविधा, उपलब्ध विक्री व्यवस्था, संधी या विषयावर मार्गदर्शन केले. सेंद्रिय, कृषि उत्पादने यांच्या विक्री व्यवस्थापनात शेतकरी उत्पादक संघाचे महत्व विषेद केले. अध्‍यक्षीय समारोप डॉ हेमंत पाटील यांनी केला. कार्यक्रमास दोन हजार पेक्षा जास्‍त शेतकरी बांधव, कृषि विस्‍तारक, प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञांनी सहभाग नोंदविला.