Wednesday, March 3, 2021

व्यक्तीमत्व विकासात तांत्रिक कौशल्यासोबतच जीवन कौशल्याचे योगदान महत्वाचे ........ डॉ. के. आनंद रेड्डी

वनामकृवितील नाहेप अंतर्गत व्यक्तीमत्व विकासावर ऑनलाईन राष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन 

व्यक्तीमत्व विकासात व्यावसायीक प्रगती सोबतच कौटुंबिक नातेसंबंध टिकवीणे व विकसीत करणे तितकेच महत्वाचे आहे. व्यक्तीमत्व विकासात तांत्रिक कौशल्यासोबतच जीवन कौशल्याचे योगदान महत्वाचे असुन नेतृत्वगुण, सादरीकरण कौशल्य, संभाषण कौशल्य आदीं कौशल्‍य आत्‍मसाद करावीत. जीवनात सर्व क्षेत्रात यश संपादीत करण्‍याकरिता विद्यार्थी व प्राध्यापकांनी जीवन कौशल्यांचा जाणीवपुर्वक अंगीकार करण्‍याचा सल्‍ला हैद्राबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेतील मानव संशोधन विकास विभागाचे संचालक डॉ. के. आनंद रेड्डी यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) च्‍या वतीने “व्यक्तीमत्व विकास व जीवन कौशल्य” या विषयावर दिनांक ३ ते ५ मार्च दरम्‍यान ऑनलाईन राष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात असुन प्रशिक्षणाच्‍या उदघाटन प्रसंगी (दिनांक ३ मार्च रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर हे होते तर आयोजक प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. बी.व्ही. आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय समारोपात डॉ. डी.बी. देवसरकर यांनी सदरील प्रशिक्षण विद्यार्थी व शास्त्रज्ञांना शैक्षणिक, संभाषण, प्रशासकीय कौशल्य विकसीत होण्यास निश्चीतच उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त केली. प्रशिक्षणाचे आयोजन सचिव नोडल अधिकारी (इएपी) डॉ. बी.व्ही. आसेवार यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती देऊन प्रशिक्षणाचा पदव्युत्तर विद्यार्थी, शास्त्रज्ञांनी लाभ घेण्‍याचे आवाहन केले तर नाहेप प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संजय पवार, यांनी केले तर आभार डॉ. मेघा जगताप यांनी मानले. विद्यार्थ्यांचे बहुआयामी व्यक्तीमत्व घडविण्यासाठी सदरील प्रशिक्षण उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व्‍यक्‍त करून सदरिल प्रशिक्षणास शुभेच्‍छा दिल्‍या. सदरिल तीन दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय प्रशिक्षणात प्रशिक्षणात विविध राज्यातील एकूण 150 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला असुन कौशल्य विकास प्रशिक्षक (तामिळनाडू) श्री. सिवाकुमार पलानीअप्पन, हैद्राबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेतील मानव संशोधन विकास विभागाचे उपसंचालक डॉ. जी. जया, आयसीएआर, नवी दिल्ली येथील मुख्‍य शास्त्रज्ञ डॉ. रॉय बर्मन, मुख्‍य शास्त्रज्ञ डॉ. सत्यप्रिय, विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या माजी विभाग प्रमुख डॉ. प्रेमलतासिंग, नवी दिल्ली येथील असीड मॅट संस्थेचे अध्यक्ष डॉ. नागेन्द्र सिंग आदी नामांकित तज्ञ मार्गदर्शन करणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. बी.व्ही. आसेवार, डॉ. एम.पी. जगताप, डॉ. मदन पेंडके, प्रा. संजय पवार यांनी केले. तांत्रिक सहाय्य नाहेपचे डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. अविनाश काकडे, श्री. रवीकुमार कल्लोजी, डॉ. नरेंद्र खत्री, इंजि. अपुर्वा देशमुख, श्री. रामदास शिंपले, मुक्ता शिंदे यांनी केले.