वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षण सभागृह व प्रयोगशाळा इमारत बांधकाम भुमिपुजन दिनांक १ मे रोजी एकात्मिक पीक पध्दती योजना कार्यालय प्रक्षेत्रावर कुलगुरू मा डॉ.अशोक ढवण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दीपाराणी देवतराज, प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, विद्यापीठ उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ.अशोक ढवण म्हणाले की, सेंद्रीय शेती ही काळाची गरज असुन विद्यापीठातील सेंद्रीय शेती प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या माध्यमातुन होणारे संशोधन तसेच विस्तार कार्य हे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल. रासायनिक खते, किटकनाशके, इतर कृषि निविष्ठाच्या वाढत्या किंमती लक्षात घेता सेंद्रीय शेती व निविष्ठा हया शेतकयांना पर्याय ठरतील. विद्यापीठ शास्त्राज्ञांनी सेंद्रीय निविष्ठा व कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करावे. या केंद्राने घेतलेल्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामुळे मराठवाडयातीलच नव्हेतर देशातील शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन मिळाले, यामुळे विद्यापीठाला नवीन ओळख निर्माण झाली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, प्रकल्पांतर्गत होणारा सेमिनार हॉल आणि प्रयोगशाळे मुळे सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षणास सुविधा प्राप्त होईल, हे शेतकयांसाठी फायेदेशीर ठरेल.
प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे म्हणाले, की सदर योजना ही ५ वर्षाकरीता आहे. या योजनेस जमिन सुधार, अद्यायावत प्रशिक्षण हॉल, प्रयोगशाळा, संशोधन व विस्तार कार्य यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. कार्यालयास विविध कामांसाठी विद्यापीठ अभियंता यांच्या मार्फत कृषि परिषद पुणे येथे प्रस्ताव मंजुरीस्तव सादर केले असता माननीय कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २०.१२.२०२१ रोजी पार पाडलेल्या कृषि परिषदेच्या बैठकीत या कार्यालयाशी संबंधित विविध कामे करण्यासाठी मान्यता मिळाली आहे.
कार्यक्रमात कामगार दिना निमित्ताने मा कुलगुरू यांच्या हस्ते श्री. विठ्ठल खटींग, श्री. दत्ता खटींग व श्री. आकाश खटींग यांचे पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सदस्य शास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार श्रीमती सारीका नारळे यांनी म्हणाले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ जया बंगाळे, प्रभारी प्राचार्य डॉ संजीव बंडेवाड, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. दिलीप मोरे, डॉ. एच. व्ही. काळपांडे, डॉ. राजेश कदम, डॉ. दिगांबर पेरके, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वासुदेवराव नारखेडे, कृषि अभियंता डॉ. मदन पेंडके आदीसह विविध कार्यालयाचे प्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी मोठया संखेने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. प्रितम भुतडा, डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. सुनिल जावळे, अभिजित कदम, सतिश कटारे, भागवत वाघ, दशरथ गरुड, सचिन रनेर आदींनी परिश्रम घेतेले.