वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांचा कार्यकाळ दिनांक ६ मे रोजी पुर्ण झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा वनामकृविचे कुलपती मा श्री भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ प्रमोद गोंविदराव येवले यांची नियुक्ती केली आहे. मा डॉ प्रमोद येवले यांनी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या कडुन दिनांक ६ मे रोजी पदभार स्वीकारला. यावेळी विधान परिषद सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारणी सदस्य मा आमदार श्री सतिश चव्हाण, परभणी विभानसभा सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारणी सदस्य मा आमदार डॉ राहुल पाटील, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा श्री निस्सार तांबोळी, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, श्री रविंद्र देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

