Friday, March 24, 2023

वनामकृवित जागतिक हवामान दिन साजरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यपीठातील अखिल भारतीय समन्वयीत कृषि हवामानशास्त्र संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने दिनांक २३ मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि हे होते तर प्रमुख मार्गदर्शक ऑनलाईन माध्‍यमातुन अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्र (इसरो) चे शास्त्रज्ञ डॉ. राहूल निगम हे लाभले होते. कार्यक्रमास संशोधन उपसंचालक डॉ. गजेंद्र लोंढे, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल यांची ऑनलाईन पध्दतीने प्रमुख उपस्थिती होती. विभाग प्रमुख डॉ. एम. जी. जाधव, मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. के. के. डाखोरे, प्रा. ए. एम. खोब्रागडे, प्रा. जी.एन. गोटे, नाहेपचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. गोदावरी पवार आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले की, हवामान हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. बदलत्‍या हवामानाचा परिणाम शेती, मनुष्य वसाहती, उद्योग आदींवर होत असुन  जनसामान्यामध्‍ये हवामान विषयक जागरूकता निर्माण करण्‍याची आवश्यक आहे. देशाचे अर्थकारण प्रामुख्याने शेतीशी निगडीत असुन देशात हवामान आधारित शेतीचा मोठा विस्तार आहे. हवामानाविषय अचूक माहिती शेतकऱ्यांसाठी लाभकारक होत आहे. सध्या अवकाळी पाऊस व गारपीट यामूळे शेतकरी त्रस्त असुन विद्यापीठाच्‍या वतीने देणात येणारा लघु संदेश शेतकऱ्यांना उपयुक्‍त ठरत आहे. कृषि हवामानाचा आधारे केलेली शेती फायदयाची ठरणार आहे.

मार्गदर्शनात डॉ. राहूल निगम म्‍हणाले की, हवामान बदल आणि परिवर्तनशीलतेचे मूल्यांकन करण्यासाठी रिमोट सेंन्सींगची भूमिका महत्‍वाची असुन हवामानाचा अचुक अंदाज दर्शविणे शक्‍य होणार आहे.  

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ. के. के. डाखोरे यांनी जागतिक हवामान दिनाची माहिती दिली तर आभार डॉ. ए. एम. खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी ए. आर. शेख, एल. एस. कदम, प्रमोद शिंदे, यादव कदम, अमोल जोंधळे, दत्ता बोबडे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.