वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय कृषि
अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व
जागतिक बॅक पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत ग्राफ्टिंग
रोबोट व्दारे पालेभाज्या व फळवर्गीय रोपांचे कलमीकरणाची प्रशिक्षण कार्यशाळेचे
आयोजन दिनांक १३ व १४ मार्च रोजी करण्यात आले असुन दिनांक १३ मार्च रोजी
कार्यशाळेचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर
साऊथ कोरीयाच्या एचआरसी कंपनीचे तज्ञ श्री जेरेमी एच जे पार्क व नाहेप प्रकल्पाचे
मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे, भाजीपाला संशोधन केंद्राचे डॉ विश्वभंर खंदारे आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ धर्मराज गोखले म्हणाले की, डिजिटल
तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन अनेक शेतीची कामे काटेकोरपणे आपण करून शकतो. प्रगत
देशात यत्रमानवाच्या मदतीने अनेक शेतकामे केली जातात. भारतातही डिजिटल शेती
तंत्रज्ञानाचा विकासाकरिता प्रयत्न केला जात आहे. रोबोट व्दारे पालेभाज्या व
फळवर्गीय रोपांचे कलमीकरण करणे शक्य होत आहे, सदर यंत्रमानवाच्या
सहाय्याने कमी वेळेत दर्जेदार रोपांचे कलमीकरण होते. कार्यशाळेच्या माध्यमातुन
या तंत्रज्ञानाची माहिती संशोधक, विद्यार्थी व नर्सरी उद्योजक होत आहे.
नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप
प्रकल्पाविषयी शेतकरी, नर्सरी उद्योजक यांना माहिती दिली. कार्यशाळेत हेल्पर रोबोटेक कंपनी, साऊथ कोरीया येथील संशोधक श्री जेरेमी एच जे पार्क यांनी कलमीकरण रोबोट विषयी मार्गदर्शन करुन टोमॅटो व वांगी रोपांच्या
रोबोटद्वारे कलमीकरण प्रात्याक्षिक करुन दाखवीले. कार्यशाळेसाठी
२५ नर्सरी उद्योजक व शेतकरी यांनी सहभाग नोंदवीला.