Tuesday, March 21, 2023

भरड धान्‍य मानवी आरोग्‍याकरिता अत्‍यंत उपयुक्‍त ....... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवितील शुशक्तिचा योग्य वापर योजनाच्‍या वतीने भरड धान्य कृषि यांत्रिकीकरण व मुल्यवर्धन प्रशिक्षण कार्याक्रमाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशुशक्तीचा योग्य वापर योजनेच्‍या अनुसुचीत जाती उपयोजना अंतर्गत भरडधान्य कृषि यांत्रिकीकरण व मुल्यवर्धन प्रशिक्षणाचे दिनांक २० ते २४ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आहे. दिनांक २० मार्च रोजी उदघाटन कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि हे होते तर उदघाटक म्हणून जिल्‍हाधिकारी श्रीमती आंचल गोयल उपस्थित होत्‍या. व्‍यासपीठावर संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, परभणी मनपा उपआयुक्त श्री. राठोड, नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, मार्गदर्शक पुणे येथील अॅग्रो झी ऑरगॅनीक्सचे संस्थापक अध्यक्ष श्री. महेश लांढे, पाणी फाऊंडेशनचे तांत्रिक सल्‍लागार श्री. ज्ञानेश्‍वर मोहीते, नाशिक येथील प्रगती अभियान संस्थेचे संचालक श्रीमती अश्‍वीनी कुलकर्णी, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, आजच्‍या जीवनशैलीमुळे मानवास अनेक आरोग्‍याच्‍या समस्‍या भेडसावत आहेत. भरड धान्‍यात लोह, जस्‍त, तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्‍त असतात, तसेच पचाण्‍यास ही भरड धान्‍य सोपी असतात. त्‍यामुळे प्रत्‍येकांनी भरड धान्‍याचा आहारात समावेश करावा. बदलत्‍या हवामानात कमी पाणी, कमी खत व कमी किडकनाशकामध्‍ये भरड धान्याची लागवड शक्‍य असल्‍याचे ते म्‍हणाले.

जिल्हाधिकारी मा.श्रीमती आंचल गोयल यांनी भरड धान्य महिलांनी दैनदिन आहारामध्ये वापर करून  स्वास्थ चांगले राखण्याचे तसेच त्यापासून भरड धान्य मुल्यवर्धन लघु उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले.

डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी भरडधान्याचे महत्व विशद करून भरड धान्य नविन पिढीस किती गरजेचे आहे तसेच त्याचे फायदे व त्यापासुन आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचे महत्वाचे साधन असल्याचे नमुद केले. प्रास्ताविकात योजनेच्या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांनी शेतकरी व महिलांना यांत्रिकीकरणाद्वारे कृषि उत्पन्नाचे मुल्यवर्धन कसे करता येईल व त्याद्वारे लघुउद्योग निर्माण करता येईल या बाबतचे मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणात डॉ. स्मिता सोलंकी यांनी कृषि यांत्रिकीकरण प्रात्यक्षिक महीला गृहउद्योग व बचत गटासाठी पापड मशिन, शेवई मशिन, मिचरी कांडप, दाल मिल, पिठची गिरणी, तेलघाणी इत्यादी यंत्राचे प्रात्यक्षिके दाखवून त्याबाबतचे मार्गदर्शन केले. श्री. महेश लोंढे यांनी त्यांच्या भरड धान्य उत्पादना विषयी प्रशिक्षणार्थीना उद्योग उभारणीकरीता लागणारी मशिनरी व सदरील उत्पादने कसे बनवावित व त्यांचे मार्किटींग कसे करावे यावर मार्गदर्शन केले. श्री ज्ञानेश्‍वर मोहीते यांनी लोकांचा सहभाग व त्यातून होणारा विकास या विशयी प्रशिक्षनार्थींना मार्गदर्शन केले. श्रीमती अश्विनी कुलकर्णी यांनी आदिवासी भागातील लोकांना भरड धान्या विषयी माहिती देवून कसे उत्पादकता वाढली, येणा-यां अडचणीवर संस्थेमार्फत  कशा प्रकारे मात केली या विषयी मार्गदर्शन केले.

सुत्रसंचालन डॉ. संदेश देशमुख यांनी केले. श्री. कैलाश गायकवाड, श्री. मस्के श्री. पठाण, श्री. शेख, सौ. जोधळे मॅडम यांनी उपलब्ध झालेल्या प्रशिक्षणार्थींचे समन्वयक म्हणून कार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अजय वाघमारे श्री. दिपक यंदे, श्री.रूपेश काकडे, श्रीमती सरस्वती पवार, पदव्‍युत्‍तर विद्यार्थी प्रियंका, विशाल काळबांडे यांनी काम केले. सदरील प्रशिक्षणास २०० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग नोंदविला.