जिंतूर तालुक्यातील मौजे मानकेश्वर येथे रेशीम उद्योजक शेतकरी श्री. भागवत इघारे यांच्या शेतात आत्मा (कृषि विभाग), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना, व जिल्हा रेशीम कार्यालय परभणी यांच्या संयुकत विद्यमाने दिनांक ३० नोव्हेंबर रोजी तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. गोविंद कदम हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून जिंतूर तहसीलचे एपीओ श्री. आवरगंड, मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, हे उपस्थित होते.
मार्गदर्शनात श्री. गोविंद कदम यांनी रेशीम शेतीसाठी विविध शासकिय योजना - मनरेगा, पोक्रा, सिल्क समग्र-२ या बददल माहिती दिली. डॉ. सी.बी. लटपटे यांनी कमी खर्चात तुती रोपवाटीका तयार करण्याबददलचे मार्गदर्शन केले व तुती पटटा पध्दत लागवडीचे प्रात्यक्षिक शेतक्ययांना दाखवले. तसेच तुती फळापासून व पानापासून ग्रीन टी, मिक्स फ्रुट जॅम, चॉकलेट, साबन, हॅन्डवॉश, वाईन इत्यादी विविध पदार्थ तयार करण्याबददल माहिती दिली.
प्रास्ताविकात श्री. धनंजय मोहोड उझी माशीवरील परोपजिवी किटकाचे महत्व सांगुन एन टी पाऊच रेशीम संशोधन योजना येथे उपलब्ध असल्याचे सांगीतले. सुत्रसंचालन श्री. भागवत इघारे यांनी केले तर आभार क्षेत्र सहाय्यक श्रीमती कांचन जाधव मानले.कार्यक्रमास मौजे मानकेश्वर परिसरातील ८० शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर मिसाळ, सुशिल वाघ, संतोष नवले, मोहन काकडे, गोविंद इघारे, ज्ञानेश्वर काकडे, पुंडलीक नवले व गावातील रेशीम उद्योजक शेतक्ययांनी परीश्रम घेतले.