Wednesday, December 6, 2023

वनामकृवि अंतर्गत रस्‍त्‍ये दुरूस्‍ती करिता रूपये १४.७५ कोटी निधीस महाराष्‍ट्र शासनाची प्रशासकीय मान्‍यता, तर आठ कोटीचा निधी वितरणास मंजुरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत परभणी मुख्‍यालय येथील रस्‍त्‍यांची कामे सन २००६ ते २००९  दरम्‍यान करण्‍यात आली होती. सन २०१० नंतर या रस्‍त्‍यांची दुरूस्‍ती करण्‍यात आलेली नाही. या रस्‍त्‍यांची मालकी ही विद्यापीठाची असल्‍याने रस्‍त्‍यांच्‍या दुरूस्‍तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन केली जात ना‍हीत. परभणी कृषी विद्यापीठातील रस्‍त्‍यांची सद्य:स्थितीत दुरावस्‍थेमुळे शेतकरी बांधव, विद्यार्थी, नागरीक व विद्यापीठ कर्मचारी यांना अनेक समस्‍यांना तोंड दयावे लागत होते. विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी कुलगुरू पदाचा कार्याभार स्‍वीकारल्‍यानंतर रस्‍त्‍ये दुरूस्‍तीबाबत प्राधान्‍य देण्‍याचे ठरविले. गेल्‍या एक वर्षापासुन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी पाठपुरावा केला. विद्यापीठातील रस्‍ते हे विद्यापीठातील मुलभूत सुविधेचा भाग असुन, या रस्‍त्‍यांची दुरूस्‍तीच्‍या कामांना प्रशासकीय मान्‍यता प्रदान करून निधी उपलब्‍ध करून देण्‍याबाबतचा प्रस्‍ताव महाराष्‍ट्र शासनास कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनानुसार विद्यापीठ अभियंता डॉ दीपक कशाळकर यांनी सादर केला होता. सदर प्रस्‍तावाची महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री धनंजय मुंढे दखल घेतली. सदर कामाकरिता १४.७५२६ कोटी रूपये निधीस प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली असुन त्‍यानुषंगाने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात पीक संवर्धन, सहायक अनुदान या लेखाशीर्षातर्गत भांडवली मत्‍तेच्‍या निर्मितीकरिता अनुदान या बाबीकरीता अर्थसंकल्‍पीय तरतुदीमधुन विद्यापीठांतर्गत रस्‍त्‍यांसाठी रूपये आठ कोटी एवढे अनुदान वितरीत करण्‍यास शासन मंजुरी देण्‍यात आली आहे.

 

या बद्दल विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्‍यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार आणि कृषि मंत्री मा ना श्री धनंजय मुंढे यांचे आभार मानले असुन सदर मुलभुत सुविधाचा लाभ राज्‍यातील शेतकरी बांधवविद्यार्थीनागरीक व विद्यापीठ कर्मचारी यांना होणार असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या विद्यापीठ अधिस्‍वीकृती प्राप्‍त करण्‍यास याचा उपयोग होणार आहे.