वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भारतीय मृद विज्ञान संस्था, शाखा परभणीच्या वतीने २१ व २२ डिसेंबर रोजी मृद शास्त्रज्ञांच्या राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात असुन परिसंवादाचे उद्घाटनास दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता कृषि महाविद्यालय सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि राहणार असुन प्रमुख पाहूणे नवी दिल्ली येथील नैसर्गिक स्त्रौत व्यवस्थापन संस्थेचे उपमहानिर्देशक मा. डॉ. सुरेश कुमार चौधरी, कृषि शास्त्रज्ञ भरती मंडळाचे सदस्य डॉ. बि.एस. व्दिवेदी, जागतिक संशोधन कार्यक्रम, इक्रीसॅट, हैद्राबाद चे संचालक डॉ. एम.एल. जाट आदींची उपस्थिती लाभणार आहे.
परिसंवादास महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठातील तसेच भारतीय कृषि अनुसंधान संस्थातील सुमारे २०० शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार आहेत. अन्न सुरक्षा आणि कृषि शाश्वतेसाठी मातीचे आरोग्य पुनरर्ज्जीवित करणे याविषयावर परिसंवादात सहभागी मृदाशास्त्रज्ञ विविध सत्रात विचारमंथन करणार आहेत. भविष्य काळात उद्योग आणि कृषि विकास यांना सुसंग तसेच जमिन व्यवस्थापन संबधीचे धोरण निश्चित करण्यात मदत होईल. माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, एनबिएसएस नागपुर चे संचालक डॉ. एन.जी. पाटील, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. स्वामी रेड्डी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन संस्थेचे माजी अतिरीक्त आयुक्त डॉ. वंदना व्दिवेदी, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक बियाणे डॉ. देवराव देवसरकर, माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद ईस्माइल आदीचा सहभाग राहणार आहे.
या परिसंवादाचे नियोजन कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद ईस्माइल यांच्या देखरेखी खाली करण्यात आले आहे. परिसंवाद नियोजनाकरिता भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणी चे अध्यक्ष डॉ. प्रविण वैद्य, सचिव डॉ.अनिल धमक, डॉ. जि.आर. हानवते, डॉ. आर.एन. खंदारे डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. गणेश गायकवाड, डॉ.सुदाम शिराळे, डॉ. स्वाती झाडे, डॉ, बि.आर. गजभिये, डॉ. पप्पीता गोरखेडे, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ. स्नेहल शिलेवंत, श्री.भानुदार इंगोले, श्री.आनंद नंदनवरे, श्री.शिरीष गोरे, श्री.रणेर, श्री.अजय चरकपल्ली आदीसह विभागातील कर्मचारी आणि पदव्युत्तर विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.