आत्मा (कृषि विभाग), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व जिल्हा रेशीम कार्यालय परभणी यांच्या संयुकत विद्यमाने दिनांक १९ डिसेंबर रोजी रेशीम उद्योजक शेतकरी श्री. देवराव माधवराव टरपले यांच्या शेतात प्रौढ रेशीम किटक संगोपन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सदस्य श्री. आकाश लाटे हे होते तर मंडळ कृषि अधिकारी मानवत श्री.रघुवीर सिंह नाईक, एस.बी.आय. परभणीचे श्री. सुनिल हट्टेकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. गोविंद कदम, कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे डॉ. चंद्रकांत लटपटे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात श्री. धनंजय मोहोड यांनी तुती लागवडीसाठी योग्य वाणाची निवड व रेशीम किटकांना उच्च प्रतिची पाने खाद्य देण्यास सांगीतले. तर डॉ. चंद्रकात लटपटे यांनी तुती रोपांची लागवड करण्याबद्दलचे मार्गदर्शन केले, रेशीम किटक संगोपनगृह निर्जतुकिकरण, रेशीम किटकावरील रोग नियंत्रण व उझी माशी नियंत्रणासाठी निसोलायनेक्स थायमस या परोपजिवी किटकाचे महत्व सांगुन एन.टी. पाऊच रेशीम संशोधन योजना येथे उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच श्री. सुनिल हट्टेकर यांनी पिक कर्ज व सिल्क आणि मिल्कची माहिती दिली.
प्रास्ताविकात श्री. गोविंद कदम यांनी रेशीम शेती संबधीत योजनेबाबत विस्तृत माहिती देऊन विविध शासकिय योजना जसे मनरेगा, पोक्रा या बाबत शेतकयांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन श्री. केशव काकडे यांनी केले तर आभार श्री. अभिजीत देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील ९९ शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वतीतेसाठी सौ. कांचन जाधव, सौ. जि. डब्ल्यु रनेर, श्री. पदमाकर टरपले, श्री. मोहन काकडे, श्री. मोहन कापसे, श्री. सिराज, श्री. गुंडे व गावातील रेशीम उद्योजक शेतक-यांनी परीश्रम घेतले.