परभणी आत्मा (कृषि विभाग), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व जिल्हा रेशीम कार्यालय परभणी यांच्या संयुकत विद्यमाने प्रौढ रेशीम किटक संगोपन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक ५ डिसेंबर रोजी मौजे आलेगाव ता. पुर्णा येथे रेशीम उद्योजक शेतकरी श्री. हनमंत गरड यांच्या शेतात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. विश्वनाथ सवराते होते तर आत्मा प्रकल्प संचालक श्री. दैालत चव्हाण, एसबीआयचे श्री. सुनिल हट्टेकर, मंडळ कृषि अधिकारी श्री. संभाजी वाघमोडे, मार्गदर्शक म्हणून जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. गोविंद कदम व रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात श्री. दौलत चव्हाण यांनी तुती लागवडीसाठी योग्य वाणाची निवड व रेशीम किटकांना उच्च प्रतिची पाने खाद्य यावर मार्गदर्शन केले. तर श्री. गोविंद कदम यांनी रेशीम शेती संबधीत विविध शासकिय योजना जसे मनरेगा, पोक्रा तथा सिल्क समग्र-२ याबाबत मार्गदर्शन करून या योजनांचा जास्तीत जास्त शेतकयांनी लाभ घेवून यशस्वी रेशीम उद्योग करावा व २० डिसेंबर २०२३ पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन केले. मार्गदर्शनात डॉ. सी.बी. लटपटे यांनी शेतात पटटा पध्दतीने फुट तुती रोपांची लागवड करण्या बददल मार्गदर्शन केले तसेच उझी माशी नियंत्रणासाठी निसोलायनेक्स थायमस या परोपजिवी किटकाचे महत्व सांगुन एनटी पाऊच रेशीम संशोधन योजना येथे उपलब्ध असल्याचे सांगीतले. श्री. सुनिल हट्टेकर यांनी पिक कर्ज व सिल्क आणि मिल्कची माहिती सांगितली तर ग्लोबल विकास ट्रस्ट परळी श्री. अतुल घाडगे यांनी रेशीम शेतकयांना ट्रस्ट तर्फे एकरी १० हजाराची मदत तुती लागवडीसाठी असल्याबाबत माहिती दिली.
सुत्रसंचालन श्री. धनंजय मोहोड यांनी केले
तर आभार श्री. विलास जोशी यांनी मानले. ७८ शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यसस्वीतेसाठी श्री. एस.बी.शिंदे, कृषि पर्यवेक्षक चुडावा, श्री. आर.डी.माने, एटीएम आत्मा, पुर्णा, सौ. कांचन जाधव, क्षेत्र सहाय्यक, श्री. रत्नाकर मुंढे, तांत्रीक सहाय्यक, श्री. आर.टी. इक्कर, बीटीएम आत्मा, परभणी, श्री. एच.आर.ढगे, सौ. सविता सोनटक्के व गावातील रेशीम उद्योजक शेतक्ययांनी
परीश्रम घेतले.