आत्मा (कृषि विभाग), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना, व जिल्हा रेशीम कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे डोंगर पिंपळा (ता. गंगाखेड) येथे प्रौढ रेशीम किटक संगोपन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक ८ डिसेंबर रोजी रेशीम उद्योजक शेतकरी श्री. सिताराम सुदाम कवडे यांच्या शेतात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. वैद्यनाथ ज्ञानोबा तिडके हे होते तर पोलीस पाटील श्री. शिवराज गवळी, मंडळ कृषि अधिकारी श्री.ए.एस.शिसोदे, एस.बी.आय.चे श्री. सुनिल हट्टेकर, केंद्रीय रेशीम बोर्डचे श्री. अशोक जाधव, रेशीम संशोधन योजनेचे डॉ. चंद्रकांत लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात श्री.ए.एस.शिसोदे यांनी तुती लागवडीसाठी योग्य वाणाची निवड व रेशीम किटकांना उच्च प्रतिची पाने खाद्य देण्यास शेतकयांना सांगितले श्री अशोक जाधव यांनी रेशीम शेती संबधीत मार्गदर्शन करुन सिल्क समग्र-२ या योजनेबाबत विस्तृत माहिती दिली. विविध शासकिय योजना जसे मनरेगा, पोक्रा याबाबत क्षेत्र सहाय्यक श्री. सागर मिसाळ मार्गदर्शन केले. डॉ. सी.बी. लटपटे यांनी शेतात पटटा पध्दतीने तुती रोपांची लागवडीबाबत मार्गदर्शन केले तसेच उझी माशी नियंत्रणासाठी निसोलायनेक्स थायमस या परोपजिवी किटकाचे महत्व सांगुन एनटी पाऊच रेशीम संशोधन योजना, वनामकृवि, परभणी येथे उपलब्ध असल्याचे सांगितले. श्री. सुनिल हट्टेकर यांनी पिक कर्ज व सिल्क आणि मिल्कची माहिती दिली.
सुत्रसंचालन श्री. धनंजय मोहोड यांनी केले तर आभार श्री. पि.एम.साळूंके यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील ६८ शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यसस्वीतेसाठी श्री. दत्तात्रय सोनटक्के, श्री. रामेश्वर राऊत, श्री. जोगदंड, श्री. रामेश्वर कवडे, श्री. अंगद पांढरे, श्री. पंढरीनाथ घोगरे, श्री. राहुल कातकडे व गावातील रेशीम उद्योजक शेतक्ययांनी परीश्रम घेतले.