राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठ कर्मचाऱ्यांची १९ वी अखिल भारतीय कुलगुरु टी २० चषक स्पर्धा दिनांक २६ डिसेंबर २०२३ ते ०६ जानेवारी २०२४ रोजी दरम्यान नागपुर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात आयोजीत करण्यात आली असून या क्रिडास्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे. दिनांक २४ डिसेंबर रोजी वनामकृविचा संघ रवाना झाला.मा. कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या कर्मचारी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. संघाचे कर्णधार डॉ धीरज पार्थीकर आहेत.
मा. कुलगुरू महोदय यांनी १९ वी अखिल भारतीय कुलगुरु टी २० चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करून विद्यापीठाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करावा असे सांगून शुभेच्छा देवून मैदानी खेळामुळे शरीर स्वस्थ चांगले राहते, कार्यक्षमता वाढिस लागते, असे म्हणाले.
यापूर्वी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित अखिल महाराष्ट्र टी २० क्रिकेट स्पर्धेत वनामकृवि परभणी चा संघ प्रथमच सहभागी झाला होता. त्यावेळी संघाने ५ पैकी तीन सामने जिंकून चांगली कामगिरी केली. वनामकृवि परभणी च्या संघातील मारोती शेल्लाळे यांना स्पेर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून पुरस्कार मिळाला.