वनामकृवितील विस्तार शिक्षण विभागाच्या वतीने शेतकरी आत्महत्याच्या बाबींची मिमांसा प्रकल्पातंर्गत पाथरी व सेलु येथे कार्यशाळा संपन्न
वसंतराव नार्इक मराठवाडा
कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय कृषि विज्ञान निधी यांच्या
संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेला 'शेतकरी कुटुबांच्या
सामर्थ्य निर्मितीतुन शेतकरी आत्महत्याच्या बाबींची मिमांसा' या प्रकल्पांतर्गत स्वयंसेवकांसाठी
दिनांक 8 व 9 मार्च रोजी पाथरी व सेलु येथील कृषि महावि़द्यालयात एक दिवसीय
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विस्तार शिक्षणाचे
विभाग प्रमुख डॉ. आर. डी. अहिरे, प्राचार्य डॉ एस जी जोंधळे, डॉ. पी. एस. कापसे, डॉ कुत्ताबादकर, आर बी लोंढे, प्रा
निरज चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत डॉ. आर. डी. आहिरे यांनी ‘शेतकरी आत्महत्या मागील कारणे’ या विषयावर विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करून कृषिच्या विद्यार्थ्यांनी तणावग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद
साधुन त्यांना मानसिक आधार देण्याचा सल्ला दिला. सदरिल
प्रकल्प प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील महाविद्यालयीन युवकांच्या सामर्थ्य
निर्मितीवर भर देण्यात येत असुन तणावग्रस्त शेतक-यांचा संशोधनात्मक अभ्यास
करण्यात येत आहे. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांतुन स्वयंसेवकाची निवड
करून त्यांना प्रशिक्षीत करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
डॉ. पी. एस. कापसे यांनी तर आभार आर बी लोंढे यांनी मानले. या कार्यशाळेत पाथरी येथील
150 तसेच सेलु येथील 120 कृषि पदवीच्या विद्यार्थ्यीनी सहभाग नोंदविला होता.