परभणी कृषि महाविद्यालयात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उद्बोधन कार्यशाळा संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या कृषि पदवी अभ्यासक्रमाच्या
सातव्या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम रावे असतो, सदरिल कार्यक्रम
राबविण्यासाठी उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 21 जुन रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर मुख्य विस्तार
शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ सी बी
लटपटे, डॉ जे व्ही एकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय
भाषणात प्राचार्य डॉ डि एन गोखले म्हणाले की, कमी कालावधीत येणारे विविध पिकांचे
वाण, जीवाणु संवर्धनाची बीजप्रक्रिया, आंतरपिक पध्दती आदीसह अनेक उपयुक्त व कमी
खर्चाचे तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेले आहे, कृषिच्या विद्यार्थ्यांनी सदरिल
तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोचवावे. आज अनेक शेतकरी स्मार्टफोनचा उपयोग करित
आहेत, त्यांना विद्यापीठ विकसित मोबाईल अॅप्स वापराबाबतचे प्रात्य़क्षिके करून दाखवावित, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यशाळेत डॉ
पी आर देशमुख, डॉ सी बी लटपटे आदीसह विषयतज्ञ व कार्यक्रम अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ जे व्ही ऐकाळे यांनी केले तर सुत्रसंचालन रावे प्रभारी अधिकारी
डॉ. पी. एस. कापसे यांनी केले. यावेळी कृषिदुत व कृषिकन्या मोठया संख्येने
उपस्थित होते. कृषि पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रात
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असुन या सत्रात विद्यार्थी प्रत्यक्ष शेतक-यांच्या शेती कसण्याचे तंत्र व
ग्रामीण जीवनपध्दतीचा अभ्यास करतात. यावर्षी महाविद्यालयाचे 228 विद्यार्थ्यी
कृषिदुत व कृषिकन्या म्हणुन पुढील
पंधरा आठवडे परभणी तालुक्यातील निवडक दहा गांवात कार्य करणार आहेत.