Tuesday, July 2, 2019

कृषि विद्यापीठाचा एक लक्ष वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा संकल्‍प.......कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित कृषि दिनानिमित्‍त वृक्ष लागवड व वृक्षदिंडीचे आयोजन
मराठवाडयातील विद्यापीठ अंतर्गत प्रक्षेत्रावर होणार वृक्षलागवड

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी कृषिदिन म्‍हणुन साजरी करण्‍यात आली. कै वसंतराव नाईक यांच्‍या स्‍मारकाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. कृषिदिनाचे औचित्‍य साधुन वृक्षलागवड वृक्षदिंडीचे आयोजन करण्‍यात आले होते.
मार्गदर्शनात कुलगूरू मा डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाचा एक लक्ष वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धनाचा मानस असून मराठवाडयातील विद्यापीठांतर्गत असलेले विविध महाविद्यालये, विद्यालये, संशोधन केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रांच्या प्रक्षेत्रावर वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले. कै वसंतराव नाईक यांच्‍या नावे हे विद्यापीठ असुन हरित महाराष्‍ट्र करण्‍यासाठी तेहतीस कोटी वृक्षलागवड अभियानात प्रत्येकांनी योगदान देण्‍याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विद्यापीठ परिसरात वृक्षदिंडी काढण्‍यात येऊन मोठया प्रमाणात वृक्षलागवड करण्‍यात आली. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ अरविंद सावते, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ टी एम तांबे, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
वृक्षदिंडी व वृक्षलागवडीत शहरातील प्रतिष्‍ठीत नागरीक डॉ रविंद्र मानवतकर, डॉ संध्‍या मानवतकर, डॉ शिरीष देशपांडे, डॉ जयश्री देशपांडे, डॉ अनिल दिवान, डॉ सुभदा दीवान, डॉ उज्ज्वला झांबरे, डॉ संजीवनी कात्नेश्वरकर, डॉ चारुशीला जवादे, डॉ रामपुरीकर, डॉ कुलकर्णी आदींनीही सक्रीय सहभाग नोंदविला.
कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ टि बी तांबे, डॉ एच व्‍ही काळपांडे, डॉ विजयकुमार जाधव, डॉ जयकुमार देशमुख, डॉ पपिता गौरखेडे, राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक व राष्‍ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, ग्रामीण कृषी कार्यानुभवाचे कृषिदुत व कृषिकन्‍या आदींसह परभणी कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.