Monday, July 1, 2019

वनामकृविच्‍या लातुर येथील कृषी महाविद्यालयात कृषिदिन साजरा


 लातूर: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील कृषी महाविद्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषिदिन साजरा करण्‍यात आला.  राष्ट्रीय सेवा योजनाजिमखाना व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपनवृक्षसंवर्धन व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रकल्प संचालक आत्मा डॉ. दिनकर जाधव, उपवन परिक्षेत्र अधिकारी श्री. सचिन माने, डॉ.अरूण कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या परिसरात भव्य वृक्षदिंडी काढण्यात येऊन कडूलिंबवडपिंपळजांभूळ व गुलमोहर आदीं एक हजार रोपांची  लागवड करण्यात आली. विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. प्रदिप इंगोले यांच्या पुढाकाराने ही चळवळ राबवण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्रशांत करंजीकर यांनी केले डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.