Monday, November 7, 2022

वनामकृविच्‍या वतीने संपुर्ण मराठवाडयातील ५० पेक्षा जास्‍त गावात मंगळवारी राबविण्‍यात येणार ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम

उपक्रमात विद्यापीठातील १०० पेक्षा जास्‍त तज्ञांचा समावेश असलेल्‍या २५ पथकांचे करण्‍यात आले गठण, उपक्रमांतर्गत शास्‍त्रज्ञ शेतकरी बांधवाशी साधणार संवाद

उपक्रमांतर्गत  कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि मौजे मंगरूळ येथील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्राला भेट देऊन साधणार संवाद

महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रम राबविण्यात येत असुन उपक्रमांतर्गत दिनांक ८ नोव्‍हेंबर रोजी एकाच दिवशी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मराठवाडयातील ५० पेक्षा जास्‍त गावात जाऊन शेतकरी बांधवाशी संवाद साधणार आहेत. यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांची २५ पथके तयार करण्‍यात आली असुन यात १०० पेक्षा शास्‍त्रज्ञांचा समावेश आहे. संपुर्ण दिवसात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतकरी बांधवाशी संवाद साधुन त्‍यांच्‍या कृषि विषयक समस्‍या जाणुन घेणार असुन शेतकरी बांधवाच्‍या शेतीस भेट देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.

सदरिल उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे मानवत तालुक्‍यातील मौजे मंगरूळ येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर भेट देऊन संवाद साधणार आहेत. 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठीउपक्रमांतर्गत मराठवाड्यातील विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या कृषी विज्ञान केंद्रेसंशोधन केंद्रेकृषी महाविद्यालये आदीं ठिकाणीचे विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि प्राध्‍यापक गावात जाऊन शेतकरी बांधवाच्‍या समस्‍या जाणुन घेणार आहेत, विविध शेती विषयक विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सदर उपक्रमांची सुरूवात दिनांक १ सप्‍टेबर रोजी करण्‍यात आली असुन दिनांक १ सप्‍टेंबर रोजी संपूर्ण मराठवाड्यात ८० विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २२ पथकांनी ६० गावांत तर दिनांक ३ ऑक्‍टोबर रोजी ११५ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २७ पथकांनी ६४ गावांत भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांच्‍या शेती विषयी तांत्रिक समस्याचे समाधान करण्यात आले. सदरिल उपक्रम कृषि विभागाच्‍या सहकार्यांने राबविण्यात येत असुन कुलगुरू मा. डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनानुसार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली शास्‍त्रज्ञांची पथके गठित करण्‍यात आली आहेत, अशी माहिती विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी दिली.