Tuesday, November 8, 2022

वनामकृविच्‍या कार्यकारी परिषदेवर नुतन चार सदस्‍यांची नेमणुक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कार्यकारी परिषदेवर नुकतेच महाराष्‍ट्र शासनाने नुकतेच चार सदस्‍यांची नेमणुक केली आहे. महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम, १९८३ नुसार विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर विद्यापीठाचे माननीय प्रति कुलपती तथा राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांनी प्रगतीशील शेतकरी या प्रवर्गातुन परभणी येथील श्री प्रविण देशमुख, सासवड (पुणे) येथील श्री सुरज जगताप, सिल्‍लोड (औरंगाबाद) येथील श्री विठ्ठल सकपाळ, कृषि उद्योजक प्रवर्गातुन हदगाव (नांदेड) येथील श्री भागवत देवसरकर यांची पुढील आदेश होईपर्यंत जास्‍तीत जास्‍त तीन वर्ष कालावधीकरिता करण्‍यात आली आहे. याबाबत नुकतेच राज्‍याच्‍या कृषि मंत्रालयाचे सहसचिवांचे आदेश विद्यापीठास प्राप्‍त झाले आहेत.