Sunday, February 19, 2023

वनामकृवित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍साहात साजरी

छत्रपती यांचा इतिहास संपुर्ण जगाला प्रेरणादायी ...... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मातील माणसांना सोबत घेऊन स्‍वराज्‍य स्‍थापन केले. छत्रपतींनी स्‍वराज्‍यासाठी आखलेली धोरणे, प्रशासन, युध्‍दनिती, सुसंघटन, रयतेच्‍या कल्‍याणासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्‍यात मोलाचे योगदान त्‍यांची आई राजमाता जिजाऊ यांचे आहे. छत्रपती यांचा इतिहास संपुर्ण जगाला प्रेरणा देणार असुन आजच्‍या युवकांनी त्‍यांच्‍या चरित्राचा अभ्‍यास करून त्‍यांचे विचार आचरणात आणावेत, असा सल्‍ला कुलगुरू मा. डॉ इन्‍द्र मणि यांनी दिला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्‍यात आली, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, प्रा. दिलीप मोरे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू मा. डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी ढोल-ताशाच्‍या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मुर्तीची विद्यापीठ परिसरात मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ सचिन मोरे यांनी केले, सुत्रसंचालन आशिष देवकर यांनी केले तर आभार शंकर भासवंडे यांनी मानलेकार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.