Monday, February 20, 2023

वनामकृवि संशोधित कृषि अवजारे जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवांपर्यंत पोहचली पाहिजेत .... कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि

वनामकृविचा अमरावती येथील दुर्गा अॅग्रो वर्क्‍स सोबत सामंजस्य करार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या वतीने लहान व मध्‍यम भुधारक शेतकरी बांधवाकरिता उपयुक्‍त अशी अनेक कृषी अवजारे विकसित करण्‍यात आली आहेत. शेतकरी बांधवामध्‍ये या अवजारांची मोठी मागणी होत आहे. याबाबींचा विचार करून सदर कृषी अवजारे जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचण्‍याकरिता परभणी कृषि विद्यापीठांने आणि दर्यापुर (अमरावती) येथील दुर्गा अॅग्रो वर्क्‍स यांच्यात दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठ विकसित १४ कृषी अवजारे निर्मितीचा अधिकार सदर दुर्गा अॅग्रो वर्क्‍स यांना देण्‍यात आले आहेत. सदर सामंजस्‍य कराराचा कार्यक्रम कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षेतखाली पार पडला.  याप्रसंगी संचालक संशोधन डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धिरज कदम, विद्यापीठ नियंत्रिका श्रीमती दिपाराणी देवतराज, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. उदय खोडके, योजनेच्या प्रमुख डॉ. स्मिता सोलंकी, विभाग प्रमुख डॉ.  राहुल रामटेके, कृषी उद्योजक दुर्गा अॅग्रो  वर्क्‍सचे श्री सुरज चंदेल आदींची उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाने अनेक कृषी अवजारे संशोधित केलेली आहेत, ही अवजारे जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवा उपलब्‍ध होण्‍याकरिता या अवजारांची दर्जेदार निर्मिती करून किफायतशीर दरात उपलब्‍ध करण्‍याची गरज लक्षात घेता, सदर सामंजस्‍य करार महत्‍वाचा आहे. केवळ कृषी अवजारे संशोधीत करून उपयोगाचे नसुन ती शेतकरी बांधवापर्यंत पोहचली पाहिजेत.