Sunday, May 19, 2024

वनामकृविच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित परिसंवादानंतर शेतकऱ्यांनी घेतला रुचकर मेजवानीचा आनंद

 विद्यापीठाच्या जैवसमृद्ध ज्वार व  बाजरा, गहू, भाजीपाला यांचा मेजवानी तयार करण्यासाठी केला उपयोग


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी आयोजित खरीप पीक परिसंवाद आणि कृषि प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ विकसित बियाणांच्या विक्रीने होणार होती. यामुळे शेतकरी सकाळ पासूनच विद्यापीठ परिसरात उपस्थित झाले होते. शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी केली आणि कृषि प्रदर्शनाच्या दालनास भेटी देऊन परिसंवादात सहभागी झाले आणि मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच तज्ज्ञांचा शेती सल्ला घेतला. यानंतर माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून विद्यापीठ विकसित आणि उत्पादित अन्नधान्य तसेच भाजीपाला पिकापासून विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली घरच्यासारखा स्वयंपाक करून सहभागी शेतकरी आणि मान्यवरांना दुपारच्या मेजवानी देण्याचे प्रथमच ठरविण्यात आले होते. त्यासाठी विद्यापीठ विकसित आणि राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले तसेच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ज्वार आणि बाजरीचे जैव समृद्ध वाणाच्या भाकरी आणि गव्हाच्या वाणाचा चपात्या आणि भाजीसाठी विद्यापीठ विकसित वांगे, टोमॅटो, लसूण, कांदा यांचा वापर करून 'रुचकर स्वयंपाक' विद्यापीठाने माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या निर्देशानुसार विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत केलेल्या भोजन समितीचे अध्यक्ष तथा बिजोत्पादन संचालक डॉ. एस. पी. मेहत्रे व सदस्य सचिव डॉ. व्ही.के. खर्गखराटे आणि समिती सदस्यांच्या निगराणीखाली तयार करण्यात आला होता. स्वयंपाक सुरु असताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी भेट देवून पाहणी केली होती. या रुचकर, स्वादिष्ट आणि पौष्टिक मेजवानीची जवळपास ५००० शेतकरी बांधवासह परिसंवादास उपस्थित मान्यवरांनी आनंद घेतला आणि समाधान व्यक्त केले. मेजवानीमुळे शेतकरी आणि मान्यवरांमध्ये विद्यापीठाप्रती आपुलकीची भावना निर्माण झाली आणि भविष्यासाठी यातून विद्यापीठाच्या कार्याला ऊर्जा मिळाली. या नावीन्य उपक्रमामुळे विद्यापीठांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले. शेतकऱ्यांची जवळपास ५००० संख्या आणि त्यांच्यातला उत्साह पाहून माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले तसेच शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधक संचालक डॉ. खिजर बेग, बिजोत्पादन संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव श्री पुरभा काळे, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता इंजी दीपक कशाळकर यांनी भोजन समिती सदस्यांचे अभिनंदन केले. मेजवानी तयार करण्यासाठी प्राचार्य डॉ. व्ही. एस. खंदारे तसेच समितीतील सदस्य डॉ. महेश देशमुख, डॉ. नीता गायकवाड, डॉ. आर. एस. जाधव, डॉ. मेघा जगताप, डॉ. घुगे, श्री कृष्णा जावळे, श्री के एस सांगळे, श्री ए डी खिल्लारे यांनी विशेष महत्त्वाचे कार्य केले