भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान
अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्ये आकाश ढगाळ राहील व दिनांक
०२/०८/२०१३ रोजी मध्यम स्वरूपाचा पाउस पडेल व पुढील काळात पावसात घट होईल. कमाल
तापमान २२.० ते ३१.० अंश सेल्सीअस राहील तर किमान तापमान १८.० ते २२.० अंश सेल्सीअस
राहील. वारे ताशी ८.० ते २१.० कि.मी. प्रति तास वेगाने नैऋत्य-पश्चिम दिशेने वाहतील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४.० ते ९५.० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५२.० ते
९३.० टक्के राहील.
मराठवाडातील शेतकरी बांधवाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातंर्गत एकात्मिक कृषि हवामान सल्ला सेवा योजनाच्या सल्ला
पत्रिकेनुसार कृषि सल्ला
सोयाबीन - पावसाचे अतिरीक्त पाणी पिका बाहेर काढून द्यावे.
वापसा येताच पाने खाणा-या अळीचा बंदोबस्तासाठी क्लोरोपायरीफॉस २० टक्के २० मिली
किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ३.५ ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
बाजरी - पावसाचे अतिरीक्त पाणी पिका बाहेर काढून द्यावे.
वापसा येताच नत्राची दुसरी मात्रा दिली नसल्यास २० किलो हलक्या जमीनीत तर ३० किलो भारी जमीनीत कोळपणी सोबत
द्यावी.
मुग / उडीद - पावसाचे अतिरीक्त पाणी पिका बाहेर काढून
द्यावे. वापसा येताच पाने खाणा-या अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के २०
मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
हळद /आले - पिकात पावसाचे पाणी साचले असल्यास
पिकाबाहेर काढून द्यावे. वापसा येताच खुरपणी करून तण नियंत्रण करावे. कंदमाशीचा
प्रादूर्भाव दिसुन येत असल्यास ५ टक्के दानेदार क्विनॉलफॉस किंवा १० टक्के
फोरेट २० किलो प्रति हेक्टर जमीनीतून द्यावे.
केळी - केळीचे पिकात पावसाचे पाणी साचुन रहाणार नाही यांची
काळजी घ्यावी. वापसा येताच ५०० ग्रॅम युरीया प्रति झाड दिला नसल्यास देण्यात
यावा.
डाळींब - डाळींब फळावरील ठिपके रोगाचे नियंत्रणासाठी
कार्बंडाझिम १० ग्रॅम + १० मिली स्टीकर प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी
करावी.
आंबा - नविन लागवड केलेल्या आंब्यामध्ये जागेवर मृदुकाष्ट
कलम करावी. कलमीकरणासाठी परभणी हापूस, केशर, सिंध्दू या वाणांची कलम कांडयाचा वापर
करावा.
भाजीपाला पिकात पावसाचे पाणी साचुन राहणार नाही याची काळजी
घ्यावी. वापसा येताच भाजीपाला पिकावरील करपा व पानावरील ठिपके रोगाचे
नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन
फवारणी करावी
या वर्षी आतापर्यंत
पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक झाले आहे. अधिकच्या पावसामुळे पिके पिवळी पडत
आहेत. त्यामुळे शेतक-यांनी शेतातील जास्तीचे पावसाचे पाणी योग्य प्रकारे
शेताबाहेर काढून द्यावे. जेणेकरून शेतात जास्तीचे पाणी साठणार नाही व मातीची
धुपही होणार नाही.
कृषी हवामान सल्ला पञिका
पञक क्रमांकः ३२
दिनांकः ०२/०८/२०१३