वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात
67 वा स्वातंत्रय दिन साजरा करण्यात
आला. या प्रसंगी कृषि महाविद्यालयाच्या मुख्य मैदानावर विद्यापीठाचे मा. कुलगूरू
डॉ किशनरावजी गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण
संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण,
कुलसचिव श्री का वि पागिरे, सहयोगी संचालक डॉ डि बी देवसरकर, नियत्रंक श्री ना ज
सोनकांबळे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ ना ध पवार,
गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्या प्रा विशाला पटणम,
अन्नतंत्र महाविद्यालयाचे डॉ पा नि सत्वधर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ शि
बा रोहीदास, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ बी एम
ठोंबरे, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित
होते.
या प्रसंगी मा कुलगुरू डॉ किशनरावजी गोरे आपल्या भाषणात म्हणाले की,
विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात सर्वाच्या सहकार्याने उल्लेखनिय
कार्य केले आहे. राष्ट्रिय पातळीवर विद्यापीठाच्या कार्यामुळे नावजले जात आहे.
आपण सर्वांच्या सहकार्याने विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रिय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न
करणे आवश्यक आहे. यावर्षी वरूणराजाच्या कृपादृष्टीने चांगला पाउस झाला असुन
पावसाचा पडणारा प्रत्येक थेंबा महत्व लक्षात घेता भविष्यात मुलस्थानी जलसंवर्धनासाठी
सुयोग्य नियोजन करावे लागणार आहे. सध्या विद्यापीठात 40 टक्के मनुष्यबळाची
कमतरता असतांना ही कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात नावीन्यपुर्ण उपक्रम
राबवीण्यात येत आहे. यावर्षी देखिल परभणी व बदनापुर येथील कृषि महाविद्यालयाच्या
विद्यार्थ्यानी यशाची परंपरा कायम ठेउन कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती परिक्षा राष्ट्रीय
पातळीवर कृषि व्यवसाय व्यवस्थापन व वनस्पतीशास्त्र या विषयात प्रथक क्रमांक पटकावला आहे. कृषि शास्त्रज्ञांच्या अथक
परिश्रमामुळे विद्यापीठाचे कार्य गतीमान झाले आहे. सन 2013-14 या शैक्षणिक वर्षात
बदनापुर येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमास सुरूवात होणार असुन यामुळे विद्यापीठाच्या
संशोधनाला बळकटी मिळणार आहे.