Tuesday, September 10, 2019

सोशल मिडियाचा अयोग्‍य वापरामुळे तरूणांमधील विचार करण्‍याचे साम‍‍र्थ्‍य कमी होत आहे.....युवा व्‍यक्‍ते श्री अविनाश भारती

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात आयोजित गणेशोत्‍सव 2019 कार्यक्रमात प्रतिपादन
भारत हा तरूणांचा देश आहे, परंतु आज तरूणवर्ग मोठया प्रमाणावर सोशल मिडियामध्‍येच तल्‍लीन आहे. आपल्‍या आयुष्‍यातील अमुल्‍य वेळ सोशल मिडियावर वाया घालवत आहेत. कोणताही संदेश विचार न करता आपण सोशल मिडियावर पुढे पाठवत आहोत. यामुळे तरूणांमध्‍ये विचार करण्‍याचे सामर्ध्‍य कमी होत आहे, असे प्रतिपादन युवा व्‍यक्‍ते श्री अविनाश भारती यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात गणेशोत्‍सव 2019 निमित्‍त दिनांक 10 सप्‍टेंबर रोजी व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रभारी विभाग प्रमुख (विस्तार शिक्षण) डॉ आर पी कदम हे होते तर विभाग प्रमुख (कृषीविद्या) डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ जे व्‍ही ऐकाळे, डॉ आर व्‍ही चव्‍हाण, गणेशोत्‍सव समिती अध्‍यक्ष अमर आमले, उपाध्‍यक्ष अभिजित पोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
युवा व्‍यक्‍ते श्री अविनाश भारती पुढे म्‍हणाले की, सोशल मिडियाचा वापर सकारात्‍मक कार्यासाठी करा. जीवनात कोणतेही यश प़्राप्‍त करण्‍यासाठी स्‍वत:शी व व वेळेशी प्रामाणिक रहा. आई-वडीलांना देवा समान माना. कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी शेती व शेतकरी यांच्‍यासाठी कार्य करण्‍याची गरज असुन मातीशी व देशाशी इमान राखा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ आर व्‍ही चव्‍हाण यांनी केले तर सुत्रसंचालन अक्षय गोडभरले यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्या‍र्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.