Monday, September 2, 2019

वनामकृविच्‍या उत्तरा मुलींच्या वसतीगृहात गणेश उत्‍सवानिमित्‍त व्‍याख्‍यानाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उत्तरा मुलींचे वसतीगृहात गणेश उत्‍सवानिमित्‍त दिनांक 2 सप्‍टेबर रोजी महिलांचे शिक्षण व मुलींचे स्‍वावलंबन या विषयावर परभणी येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्‍या मुख्याध्यापिका सौ. जया बालासाहेब जाधव यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास वसतीगृह सहाय्यक अधिक्षीका डॉ मिनाक्षी पाटील व डॉ मेघा सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका सौ. जया बालासाहेब जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाल्‍या की, महिलांचे शिक्षण हे समाज घडविण्यासाठी फार उपयोगी पडते. प्रत्येक मुलींनी जीवनात स्वावलंबी बनण्‍याचा प्रयत्‍न करावा, असा सल्‍ला त्यांनी दिलाडॉ. मेघा सुर्यवंशा यांनी मुलींना भविष्यामध्ये करियरच्या अनेक संधी उपलब्ध असून त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा असे सांगितले तर प्रास्‍ताविकात डॉ. मिनाक्षी पाटील मुलींना श्रद्धा ही विवेकापुरती मर्यादित असली पाहीजे जर ती विवेकाच्या पुढे गेली की श्रद्धा अविवेकी होते असे मत व्यक्त्त केले
सुत्रसंचलन धनश्री जोशी हिने केले तर आभार पुनम रायकर हिने मानले. कार्यक्रम यस्वीतेसाठी डॉ. स्नेहल शिलेवंत, मृदुला रोजेकर, माया कुन्टे, आरती पाटील, चित्रा कंन्नर, किरण शिंदे, सोनाली इंगळे, गीतांजली केतके, प्रियंका बोर्डे, मेघा कोतुरवार, सुनील शिंदे, राम मोहीते आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास वसतीगृहातील विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या. कार्यक्रम आयोजन परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले व मुख्य वसतीगृह अधिक्षक डॉ. आर पी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.