Sunday, September 15, 2019

वनामकृविच्‍या लातुर येथील कृषि महाविद्यालयात शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन लातुर येथील कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले असुन मेळाव्‍याचे उदघाटन लातुर जिल्‍हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे  अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री मा नामदार श्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन राज्‍य कृषि मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल, लोकसभा सदस्‍य मा खासदार श्री सुधाकर श्रृंगारे, मा खासदार श्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर, लातुर जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष मा श्री मिलींद लातुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्‍हणुन कृषि आयुक्‍त मा श्री सुहास दिवसे, जिल्‍हाधिकारी मा श्री जी श्रीकांत, लातुर जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा श्री विपीन इटनकर, विधानपरिषद सदस्‍य मा आमदार श्री सतीश चव्‍हाण, मा आमदार श्री विक्रम काळे, मा आमदार श्री सुरेश धस, विधानसभा सदस्‍य मा आमदार श्री अमित देशमुख, मा आमदार श्री विनायकराव पाटील, मा आमदार श्री सुधाकर भालेराव, मा आमदार श्री बसवराज पाटील, आमदार श्री त्र्यंबक नाना भिसे, लातुर महा‍नगरपालिका महापौर मा श्री सुरेश पवार आदींची उपस्थिती लाभणार आहे.
मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात हवामान बदलावर आधारीत पिक पध्‍दतीवर डॉ बी व्‍ही आसेवार, सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञानावर डॉ डी के पाटील, गळीत धान्‍य लागवड तंत्रज्ञानावर डॉ एम के घोडके तर रबी हंगामातील किडी व्‍यवस्‍थापनावर डॉ एस डी बंटेवाड आदी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन विद्यापीठ शिफारसीत तंत्रज्ञानावर आधारित व इतर संलग्‍न विभागांचे प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. मेळाव्यात विद्यापीठ संशोधित बियाणांची विक्री होणार आहे. सदरिल शेतकरी मेळाव्‍यास शेतकरी बांधवानी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले, संशोधन संचालक डॉ डी पी वासकर, लातुर विभागीय कृषि सहसंचालक डॉ टी एम जगताप, लातुर जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डी एस गावसाने, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख आदींनी केले आहे.